Take a fresh look at your lifestyle.

‘पावनखिंड’चे तिकिट दाखवा आणि मिसळीवर डिस्काउंट मिळवा; चिन्मय मांडलेकरची भन्नाट पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बाजीप्रभूंनी निष्ठा दर्शविणारा ऐतिहासिक कथानकावर आधारित ‘पावनखिंड’ प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाला समीक्षकांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. तर प्रेक्षकांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान प्रेक्षकांचे प्रेम केवळ चिरपटाच्या बुकींवरून नव्हे तर विविध स्कीमवरून देखील दिसते आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे आता पावनखिंड चित्रपटाच्या तिकिटावर पुण्यातील जोगेश्वरी मिसळने एक भानात ऑफर ठेवली आहे. तिकीट दाखवा आणि मिसळीवर २०% डिस्काउंट मिळवा अशी हि ऑफर आहे आणि याबाबतची माहिती अभिनेता चिन्मय मांडलेकरने दिली आहे.

चित्रपटाला मिळणार चांगला प्रतिसाद हे कथानक आणि कलाकारांचे यश आहे. या चित्रपटाची चर्चा सर्वत्र महाराष्ट्रात सुरू आहे. दरम्यान पुण्यातल्या एका व्यक्तीची या चित्रपटासंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर लक्षवेधी ठरली आहे. याबाबत चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकरने इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आपण पाहिलीच. तर आता ‘पुष्पा’पेक्षा जास्त प्रेम ‘पावनखिंड’वर करणं हे मराठी माणसाचं कर्तव्य आहे, असं आवाहन या पोस्टद्वारे करण्यात आलं आहे.

याशिवाय चिन्मयने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे की, जोपर्यंत ‘पावनखिंड’ चित्रपट हा थिएटरमध्ये सुरू असेल तोपर्यंत ग्राहकांना मिसळीवर डिस्काऊंट मिळेल. पावनखिंड हा चित्रपट पाहिल्याचे तिकिट घेऊन या आणि मिसळवर २०% डिस्काऊंट मिळवा. अशी भन्नाट ऑफर जोगेश्वरी मिसळतर्फे देण्यात आली आहे. ‘पुष्पा’पेक्षा जास्त प्रेम ‘पावनखिंड’वर करणे हे मराठी माणसाचं कर्तव्य आहे, या ओळीने तर अनेक नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.