Take a fresh look at your lifestyle.

अबब! श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता फक्त ‘हे’ २ कलाकार तिच्या पुढे

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन  |  बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर अशी एक अभिनेत्री आहे जी सोशल मीडियावर बर्‍यापैकी हिट आहे. इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या बाबतीत, श्रद्धाने सर्व कलाकारांना मागे टाकले आहे आणि बॉलिवूडमधील सर्वाधिक फॉलोअर्स असलेली सेलिब्रिटी बनली आहे. तिच्या चित्रपटांसोबतच तिचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत असून तिचे फोटो लोकाना खूप आवडतात.

आता इंस्टाग्रामवर श्रद्धा कपूरचे 5 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. बॉलिवूडमधील सर्वाधिक नामांकित सेलिब्रिटींच्या यादीत श्रद्धा कपूर आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रद्धा कपूरच्या पुढे प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण यांची नावे आहेत. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत खास नाव कमावलेल्या प्रियंका आणि दीपिकाचे श्रद्धापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. जर आपण फॉलोअर्सबद्दल बोललो तर प्रियंका चोप्राचे 54.7 आणि दीपिका पादुकोणचे 50.3 फॉलोअर्स आहेत.

आकडेवारी सांगते की श्रद्धा कपूर दीपिका पादुकोणपेक्षा फार मागे नाही. त्याचवेळी, आलिया भट्टचे नाव चौथ्या क्रमांकावर असून तिचे 47.8 फॉलोअर्स आहेत. श्रद्धा कपूर इंस्टाग्रामवरही खूप अ‍ॅक्टिव्ह असून अलीकडेच,श्रध्दा ने लॉकडाऊन दरम्यान देखील तिच्या चाहत्यांसह आपली पर्सनल ऍक्टिव्हिटी लोकांना शेअर केली होती.

त्याचबरोबर श्रद्धा च्या इन्स्टाग्राम अकाउंटबद्दल बोलायच झालं तर श्रद्धाने आतापर्यंत 1648 पोस्ट्स शेअर केल्या आहेत आणि ती 529 लोकांच्या फॉलो करत आहेत. तिच्या ग्लॅमरस फोटोंसोबत फिल्म प्रमोशन आणि थ्रोबॅक पिक्चर्स देखील श्रद्धाच्या पोस्टमध्ये समाविष्ट आहेत. तसेच श्रद्धा फनी पोस्टही बर्‍याच वेळा शेअर करत असते.