Take a fresh look at your lifestyle.

श्रुती मोदीचा धक्कादायक खुलासा ; सुशांतच्या आयुष्यातील सर्व महत्वाचे निर्णय रियाच घ्यायची

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या तपासाने आता वेग घेतला आहे. नुकतंच हे प्रकरण आता सीबीआय कडे गेल्यानंतर काही धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत.जी सहा लोक सीबीआयच्या निशाण्यावर आहेत त्यातील एक धक्कादायक नाव म्हणते श्रुती मोदी. सुशांतची बिझनेस मॅनेजर असणाऱ्या श्रुती मोदी हिने आता रियाबाबत काही खुलासे केले आहेत.

श्रुती मोदीने दिलेल्या जबाबानुसार जेव्हापासून सुशांतच्या आयुष्यात रिया आली आहे तेव्हापासून त्याच्या आयुष्यातील सर्व महत्वाचे निर्णय तिच घेत असे. श्रुतीने काही उदाहरणे देत ईडीला ही बाब सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचप्रमाणे सुशांतचे प्रोफेशनल आणि आर्थिक निर्णयही रियाच घ्यायची अशी माहिती श्रुतीने दिली. मिळालेल्या माहितीनुसार श्रुती सुशांतची त्यावेळी बिझनेस मॅनेजर होती, जेव्हा रियाची आणि सुशांतची ओळख झाली होती. तसेच रियाचे काही बिझनेस प्रोजेक्ट्स देखील श्रुतीने सांभाळले होते. मात्र फेब्रुवारी 2020 नंतर सुशांत आणि श्रुती कमी वेळा भेटल्याचे तिने म्हटले आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस या प्रकरणात सातत्याने चौकशी करत होते. त्याचवेळी सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांच्या पथकानेही मुंबई गाठली. आता हे प्रकरण सीबीआयकडे आहे. दुसरीकडे, ईडी देखील या प्रकरणाची मनी लाँड्रिंगच्या अँगलने चौकशी करत आहे.

Comments are closed.