Take a fresh look at your lifestyle.

सिद्धांत आणि शर्वरी वाघ बनणार नवे बंटी-बबली

0

हॅलो बॉलीवूड, ऑनलाईन । तुम्हाला आठवत असेल तर २००५ मध्ये राणी आणि अभिषेक बच्चनचा ‘बंटी और बबली’ आला होता, (त्यातलं ऐश्वर्या आणि अमिताभचं ‘कजरा रे’ विसरलात तर रसिक कसले!) गाजलेली गाणी, खुमासदार गोष्ट यामुळे हा चित्रपट हिट ठरला होता. यानिमित्ताने अभिषेक, अमिताभ आणि ऐश्वर्याने एकाच गाण्यावर ठुमका लावून भारतभर गाणं गाजवलं होतं. यशराज फिल्म्सकडून बंटी और बबली ‘२’ ची अनाऊन्समेंट झाली आहे.

खुद्द आदित्य चोप्राने लिहिलेल्या या कथेचा दुसरा भाग लिहून शूटच्या तयारीत आहे. मात्र या भागात त्याची ओरिजिनल कास्ट दिसणार नसून बंटीच्या जागी ‘गली बॉय’ फेम सिद्धांत चतुर्वेदी आणि बबलीच्या पात्रात मराठमोळी शर्वरी वाघ दिसणार आहे. तिने या आधी काय काम केलंय हे कळायला मार्ग नाही, एखादं इंग्लिश नाटक केलं असण्याची शक्यता आहे. तसंच शर्वरी ही विकी कौशलचा भाऊ सनी कौशलची गर्लफ्रेंड असल्याचे म्हटले जाते. तरीही यशराज फिल्म्स मध्ये संधी मिळणं ही मोठी नशिबाची गोष्ट आहे. रणवीर, अनुष्का, आयुष्यमान, भूमी सारखंच ही पोरगीही नाव काढेल असं म्हणायला हरकत नाही.

तब्बल १४ वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल बनत आहे. वरून शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. अभिषेक आणि राणीचा स्टारडम आज २००५ सारखा राहिला नाही. मात्र सिनियर बच्चन यांनी ते टिकवून ठेवलंय. ‘बंटी और बबली’ मधलं त्यांचं पात्रही खूप रंजक आणि महत्वाचं होत. ते खडूस पोलीसाचं पात्र कोण साकारणार हा मात्र नक्की रस घेण्यासारखा विषय आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: