हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दररोजची धावपळ, दगदग प्रत्येकाच्या शरीराला सोसेलच असं नाही. त्यामुळे शरीर दमून थकून जाणं फार साहजिक आहे. असाच काहीस झालं आपल्या लाडक्या सिद्धू सोबत. अभिनेता सिद्धार्थ जाधव गेल्या ८ दिवसांपासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात ऍडमिट होता. ‘तमाशा live’, ‘दे धक्का 2’ या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये तो बरेच दिवस न थांबता सतत धावपळ करत होता आणि याचा परिणाम त्याच्या तब्येतीवर झाला. गेल्या काही दिवसांपासून त्याची तब्येत नरम होती आणि यामुळे तो आजारी पडला. या संदर्भात माहिती देणारी एक पोस्ट त्याने चाहत्यांसह शेअर केली आहे.
सिद्धार्थ गेला संपूर्ण एक आठवडा मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात ऍडमिट होता. यानंतर सोमवारी १५ ऑगस्ट २०२२ रोजी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर सिद्धार्थने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत आपल्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे कि, गेल्या काही दिवसात सातत्याने केलेली धावपळ आणि दगदगीमुळे माझ्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. सिद्धार्थने या पोस्टसह रुग्णालयातील एक फोटोसुद्धा शेअर केला आहे.
सिद्धार्थने लिहिलंय कि, ‘नमस्कार …. गेला आठवडाभर मी हिंदुजा हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होतो..आज घरी आलो… मनापासून आभार हिंदुजा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे..खुप मनापासुन काळजी घेतली माझी… अभिनव महाडीक दादा आणि त्यांची संपूर्ण टिम… एका फोन वर नेहमीच धावून येणारे अमेय खोपकर दादा ….शशांक नागवेकर दादा.. लव्ह यू अलवेज..सतीश राजवाडे दादा आणि स्टार प्रवाह परिवार तुमचा पाठिंबा खुुप महत्त्वाचा होता….. आणि माझा मोठा भाऊ डॉ. लावेश जाधव जो रात्रभर जागून माझी काळजी घेत होता.. मी बरा व्हाव्हा म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं.. त्यांना मनापासून धन्यवाद… आता हळूहळू बरा होतोय… खुप धावपळ असते आपली… पण त्यातही स्वतःच्या तब्येतीकडे कडे दुर्लक्ष होणार नाही याची कृपया काळजी घ्या…’
Discussion about this post