Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बलात्काराच्या वाढत्या घटनांवर केलेल्या वक्तव्यामुळे बरसला सिद्धार्थ शुक्ला; अधिक जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १३ चा विजेता व अभिनेता सिद्धार्थ शुक्ला त्याच्या परखड स्वभावासाठी चर्चेत असतो. त्याच्या याच अंदाजासाठी तो इंडस्ट्रीत ओळखला जातो. मात्र यावेळी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेला सिद्धार्थ सध्या चर्चेत आहे तो त्याच्या एका ट्विटमुळे. आपल्या या ट्विटमधून सिद्धार्थने चक्क पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चांगलेच सुनावले आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांवरून इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्यामूळे सिद्धार्थचा पार चांगलाच चढला आणि त्याने परखडपणे आपले मत मांडले. काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या वाढत्या घटनांवरून इम्रान खान यांनी अक्कल पाझरवली होती. ते म्हणाले होते, ‘लैंगिक शोषण अश्लीलतेमुळे होते. ही अश्लीलता पाश्चिमात्य आणि भारतीय संस्कृतीतून येते. प्रत्येक पुरूषाकडे इतका संयम नसतो’. त्यांच्या याच वक्तव्यावरून सिद्धार्थ शुक्लाने त्यांना चांगलेच सुनावले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी २ तास नागरिकांशी फोनवर चर्चा करत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली होती. या दरम्यान एका नागरिकाने त्यांना सरकार बलात्कार आणि लहान मुलांच्या शोषणाच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहे असा एक प्रश्न विचारला होता. यावर इम्रान खान यांनी या घटनांबद्दल नाराजी व्यक्त करत निषेध केला. लैंगिक शोषण अश्लीलतेमुळे होते. ही अश्लीलता पाश्चिमात्य आणि भारतीय संस्कृतीतून येते. प्रत्येक पुरूषाकडे इतका संयम नसतो.अश्लिलता वाढत असेल तर त्याचे परिणामही भोगावे लागतील, असे ते म्हणाले होते. यानंतर त्यांनी धर्मावर मत मांडत इस्लाम धर्मात बुरखा घालणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले होते. यामुळे प्रलोभनाला नियंत्रित करता येते असा दावा त्यांनी केला होता.

‘वाह रे वाह दुनिया वालो…मग तर अशा प्रकरणात ज्या पुरूषांकडे संयम नाही म्हणता, त्यांना नपुंसक बनवले पाहिजे,’ असे ट्विट सिद्धार्थ शुक्लाने केले. सिद्धार्थच्या या ट्विटवर सोशल मीडिया युजर्सनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या. इम्रान खान यांच्या एका समर्थकाने यानिमित्ताने सिद्धार्थला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. इम्रान यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे या समर्थकाने लिहिले. सिद्धार्थने या समर्थकालाही फैलावर घेतले. ‘अरे भावा, त्यांनी तसे म्हटले नसेल तर मग त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सवर मानहानी दावा ठोकायला हवा. कारण शेवटी त्यांच्या देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, हो ना?,’ असे सिद्धार्थने लिहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.