सिद्धार्थ आणि कियाराचे मार्ग झाले वेगळे; ब्रेकअपनंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
हॅलो बॉलिवुड ऑनलाईन। बॉलिवूड मधील अनेक कपल्स असे आहेत ज्यांची चर्चा सतत होत असते. यांपैकी एक कपलं म्हणजे बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी. पण आता याना कपल कसं म्हणायचं.? असा एक प्रश्न पडलाय. याचे कारण म्हणजे अलीकडेच त्यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. यानंतर आता सिद्धार्थ मल्होत्रा याची सोशल मीडियावरील पोस्ट पाहून तो नाराज आणि उदास आहे असे वाटू लागले आहे. त्याची हि पोस्ट ब्रेकअपच्या चर्चांना दुजोरा देते आहे असे भासतेय.
अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत असलेलं सिद्धार्थचं नातं हे सोशल मीडियावर चांगलच गाजत होतं. अशातच आता त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. एकीकडे सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरल्यामुळे त्यांचे चाहते चांगलेच खुश होते. पण आता त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली आणि चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. त्यात सिद्धार्थची पोस्ट पाहून खरोखरच त्यांचं ब्रेकअप झालं का काय असा सवाल चाहत्यांना पडला आहे.
ब्रेकअपनंतर सिद्धार्थने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने स्वतःचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, ‘सूर्यप्रकाशाशिवाय दिवस कसा असेल, तुम्हाला माहिती आहे… रात्र…’ असं त्याने लिहिलं आहे. सध्या सिद्धार्थची हि पोस्ट तुफान व्हायरल होतेय. कारण सिद्धार्थच्या या पोस्टनंतर, त्याच आणि कियाराच ब्रेकअप नक्की झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून त्या दोघांमध्ये वाद सुरू होते. यानंतर दोघे आता एकमेकांना भेटतसुद्धा नाही. म्हणूनच कियारा – सिद्धार्थच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. पण यामुळे आता चाहते मात्र निराश झाले आहेत .