Take a fresh look at your lifestyle.

‘शेरशाह’नंतर सिद्धार्थ मल्होत्राची पुन्हा एकदा वर्दीत वर्णी; एंट्री देखोगे तोह हिल जाओगे!

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड सिनेसृष्टीला एकाच वेळी तीन हिरे गवसले. आलिया भट्ट, वरूण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा. या तिघांचाही जोनर वेगळा असला तरीही तिघेही हिट आहेत बॉस. सध्या आघाडीच्या कलाकारांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राचे नाव खूप वर आहे. अगदी टॉप १० मध्ये सिद्धार्थ आहेच. याचे कारण म्हणजे त्याचा दमदार अभिनय, हटके अंदाज, स्टायलिश लूक आणि आय हाये स्माईल. अलीकडेच शेरशहा चित्रपटातून त्याने साकारलेल्या कॅप्टन विक्रम बत्रा या पात्राचे सर्व स्तरावरून विशेष कौतुक झाले. या भूमिकेसाठी सिद्धार्थने सलग एकाहून एक अवॉर्ड्स मिळवले. यानंतर आता पुन्हा एकदा सिद्धार्थ वर्दीत पहायला मिळणार आहे.

‘शेरशाह’च्या यशानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा वर्दीत दिसणार आहे. मुख्य म्हणजे यावेळी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत नावाजलेले लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या ऍक्शन बेस सिरीजमध्ये दिसणार आहे. त्यामुळे हि सिरीज प्रेक्षकांसाठी नक्कीच मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. याचा पहिला टिझर काही तासांपूर्वीच प्रेक्षकांसोबत शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सिद्धार्थची पहिली झलक आणि त्याची एंट्री तसेच शूटिंग सेट दाखविण्यात आला आहे. या टिझरमध्ये रोहित शेट्टी स्वत: सेटवर कार आणि बंदुकांची चाचणी करताना दिसत आहे. तर आणखी एका व्हिडिओमध्ये सिद्धार्थची एंट्री दाखवली आहे. हा टिझर सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आपल्या आगामी सिरीजचा आणि रोहित शेट्टी यांच्यासोबतच काम करण्याचा आनंद शेअर केला आहे. हा टिझर शेअर करत सिद्धार्थने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘जेव्हा @itsrohitshetty ऍक्शन म्हणतात… तेव्हा तुम्हाला माहिती असेल त्याच शाब्दिक अर्थ काय असेल..’ हा टिझर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तर अमेझॉन प्राईम हि सिरीज प्रदर्शित करणार आहे. याच टिझर रिलीज करताना अमेझॉन प्राईमच्या अधिकृत पेजवर लिहिले कि, पोलीस दल विस्तारतेय!! ‘भारतीय पोलिस दल’ची घोषणा करत आहे – एक अ‍ॅक्शन मनोरंजन मालिका जी आमच्या पोलिस दलांच्या निःस्वार्थ सेवेला आणि अटूट वचनबद्धतेला सलाम करते. अतिशय कठीण… @sidmalhotra अभिनीत @itsrohitshetty @rohitshettypicturez निर्मित अ‍ॅक्शनसाठी तयार व्हा! या ऍक्शन ड्रामामध्ये एकूण ८ एपिसोड असतील आणि या संपूर्ण सीरिजचे रोहित शेट्टी यांनीच दिग्दर्शन केलेले आहे.