Take a fresh look at your lifestyle.

गायक उदित नारायण झाले आजोबा; आदित्य नारायणला कन्यारत्न प्राप्ती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील ९०चा काळ गाजवलेले सुप्रसिद्ध गायक उदित नारायण आजोबा झाले आहेत. त्यांचा मुलगा आणि गायक आदित्य नारायण याला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. याबाबत आदित्यने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. हि गोड बातमी आपल्या चाहत्यांना सांगण्यासाठी त्याने हि पोस्ट शेअर करत लिहिले कि, ‘देवाने आमच्या घरी सुंदर चिमुकल्या मुलीला पाठवलं आहे. यासोबत त्याने आपल्या लग्नाचा फोटोदेखील शेअर केला आहे. दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ रोजी आदित्यची पत्नी आणि अभिनेत्री श्वेता अग्रवाल हिने चिमुकल्या मुलीला जन्म दिला आणि नारायणांच्या घरी आनंदी आनंद झाला आहे.

एका माध्यमाला मुलाखत देताना आदित्यने सांगितले कि, “माझ्या बाबांना (उदित नारायण) सुखद धक्का बसला आहे. ते सतत बाळाकडे पाहत आहेत आणि तिला परी म्हणून हाक मारत आहेत. सुरुवातीला ते तिला उचलून घ्यायला घाबरत होते. पण काही दिवसांनी मीच बाळाला त्यांच्याकडे दिलं. तिचे डायपर्स बदलणं आणि इतर कामांना मी सुरुवात केली आहे. ती माझ्यासारखी दिसते असं मला वाटतं. देवाने तिच्या रुपात एक सुंदर भेट आम्हाला दिली आहे.” याआधी एका मुलाखतीत आदित्यने आपल्याला मुलगी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. अखेर त्याची ही इच्छा पूर्ण झाली आणि आदित्य बाबा झाला.

गायक आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल हे दोघेही जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट करत होते. यानंतर त्यांनी १ डिसेंबर २०२० रोजी लग्नगाठ बांधली. त्यांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरात कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले होते. माहितीनुसार, शापित चित्रपटाच्या सेटवर आदित्य आणि श्वेताची भेट झाली. त्यांनी हा चित्रपट एकत्र केला होता. दरम्यान त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर गेल्या बऱ्याच काळापासून आदित्य इंडियन आयडॉल या सिंगिंग शोचे होस्टिंग करताना दिसतोय. मात्र आता त्याने होस्टिंगपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलाय.