Take a fresh look at your lifestyle.

हम हो गये तुम्हारे! गायिका कनिका कपूर पुन्हा करतेय लग्न; मेहंदीच्या फोटोंनी वेधलं लक्ष

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मनोरंजन क्षेत्रातील बरीच चर्चतली कपल्स लग्न करताना दिसत आहेत. अलीकडेच कॅटरिना कैफ आणि विकी कौशलने लग्न केलं. त्यानंतर आलिया भट आणि रणबीर कपूरने लग्न केलं. आता तर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पण लग्न करणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. अशातच सुप्रसिद्ध बॉलिवूड गायिका कणिक कपूर सुद्धा लग्न करणार आहे आणि मुख्य म्हणजे अशी चर्चा वगैरे नाही बरं का.. तर हे खरंच घडतंय. तिच्या हळदीचे आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘जुगनी जी’ आणि ‘बेबी डॉल’ यासारखी लोकप्रिय गाणी गाऊन कनिका कपूर प्रसिद्धिच्या झोतात आली आहे. आज ती स्वतःचा बॉयफ्रेंड गौतम हाथीरमानी याच्या सोबत लग्नबंधनात अडकत आहे. सध्या तिच्या हळदी आणि मेहेंदी समारंभाच्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. कनिका आणि तिचा बॉयफ्रेंड गौतम यांनी एकमेकांना गेल्या अनेक महिन्यांपासून डेट केल्यानंतर आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या हळद आणि मेहेंदी समारंभाची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे.

मुख्य म्हणजे कनिकाच्या हळद आणि मेहेंदी समारंभात अतिशय सुंदर अशी गुलाबांची सजावट केली होती. यामध्ये रंगबिरंगी गुलाबांचा समावेश होता. खूप स्वप्न नवीन आशा आणि नव्या उमेदीच्या वातावरणात हे समारंभ जल्लोषात पार पडले. मुख्य म्हणजे, गायिका कनिका कपूर हि तिचा बॉयफ्रेंड गौतम हाथीरमानीसोबत करत असलेलं लग्न हे तीच दुसरं लग्न आहे. याआधी तीच एक लग्न होऊन गेलं आहे. तिचं पहिलं लग्न १९९८ सालामध्ये व्यावसायिक राज चंदोकसोबत झालं होतं. पुढे काही वादांमुळे तिने २०१२ साली राज चंदोकपासून घटस्फोट घेतला. पण तिला या नात्यातून तीन मुलं आहेत आणि आज यशस्वी गायिका असण्यासोबत ती एक उत्तम आई देखील आहे. तब्बल १० वर्षानंतर आज ती पुन्हा एकदा नव्या आयुष्याची स्वप्न पाहतेय.