Take a fresh look at your lifestyle.

‘नीती- निहार’च्या घरी ‘Son-rise’; इंस्टाग्रामवर दिली चाहत्यांना आनंदाची बातमी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिंगर नीति मोहन आणि तिचा पती अभिनेता निहार पांड्या हे दोघेही आई-बाबा झाले आहेत. अभिनेता निहार पांड्या याने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. नीतिने बुधवारी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. नीति व बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. निहारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नीतिसोबतचा एक अतिशय सुंदर आणि रोमँटिक फोटो शेअर करत स्वतः बाबा झाल्याची बातमी दिली आहे. त्याच्या या पोस्टनंतर नीति व निहारवर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे.

निहारने हि बातमी देताना आपल्या पोस्टमध्ये लिहिले कि, ‘आज या पावसाळी आणि ढगाळ दिवशी आमच्या घरी ‘सन-राइज’ झाला आहे. माझ्या सुंदर पत्नीने मला माझ्या वडिलांनी जे शिकवले ते आमच्या मुलाला शिकवण्याची संधी दिली. ती रोज माझ्या आयुष्यात नवा आनंद घेऊन येते. नीति आणि आमचे बाळ एकदम स्वस्थ आहेत,’.

तर नीतिची बहीण प्रसिद्ध डान्सर शक्ती मोहनने सोशल मीडियावर आपल्या बहिणीला शुभेच्छा दिल्यात. ‘खूप आनंद झाला आहे. मी मावशी झाले. आता आम्ही तुमच्या छोट्या बेबीला बिघडवण्यासाठी तयार आहोत, पार्टीसाठी तयार आहोत,’ अशी पोस्ट तिने केली. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात नीति व निहारच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. नीतिने अ‍ॅनिवर्सरीच्या दिवशी निहारसोबतचा एक फोटो शेअर करीत आई होणार असल्याची गुड न्यूज दिली होती.

नीति आणि निहार यांनी १५ फेब्रुवारी २०१९ रोजी लग्नगाठ बांधली होती. या दोघांचे हे लव्हमॅरेज आहे. त्यांचा विवाह अगदी राजेशाही पद्धतीने झाला होता. या शाही लग्नसोहळ्याची हैदराबादमध्ये खूूप चर्चा झाली होती. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

निहारने ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. नीतिबद्दल बोलायचे झाले, तर ती बॉलिवूड जगतातील एक आघाडीची गायिका आहे. जब तक है जान, सोनू के टीटू की स्वीटी अशा सुपरहिट चित्रपटांसाठी तिने गाणी गायली आहेत. निती संगीताच्या क्षेत्रात उच्च स्तरावर असताना तिची बहीण शक्ती मोहन आणि मुक्ती मोहन या दोघीही आघाडीच्या डान्सर आहेत.