Take a fresh look at your lifestyle.

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी लैंगिक शोषणाचा बळी पडली होती ‘ही’ प्रसिद्ध गायिका

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिवसेंदिवस आपण लैंगिक अत्याचाराच्या बातम्या वाचत असतो. अभिनय क्षेत्रात काम करत असताना अनेक कलाकारांनीही या विषयी अनेकदा वाचा फोडली आहे. या विषयावर पूर्वी इतके मनमोकळेपणाने बोलले जायचे नाही. मात्र आता अनेकजण त्यांना आलेल्या विचित्र अनुभवाविषयी उघडपणे बोलतात. ‘जग घुमेयाँ’ आणि ‘दिल दिया गल्लाँ’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांची गायिका नेहा भसिनने लैंगिक शोषणाचा धक्कादायक अनुभव सांगितला. लहानपणी हरिद्वार याठिकाणी गेली असता तिच्यासोबत असा प्रसंग घडला असल्याचे तिने म्हटले आहे.

IANS ला दिलेल्या मुलाखतीत नेहाने सांगितलं, “मी दहा वर्षांची होते. तेव्हा हरिद्वार याठिकाणी होते. माझी आई माझ्यापासून काही अंतरावर उभी होती. अचानक एका व्यक्तीने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मी घाबरले आणि तिथून पळाले. त्यानंतर काही वर्षांनी एका हॉलमध्ये अशीच घटना पुन्हा घडली. या घटना मी कधीच विसरू शकत नाही. मला आधी वाटायचं की माझीच चूक आहे. सध्याच्या घडीला सोशल मीडियावरही अपशब्द, आक्षेपार्ह भाषा वापरून लोकांना त्रास दिला होता. मला हा चेहरा नसलेला दहशतवादच वाटतो, असे नेहा भसिन म्हणली.

एका मुलीसाठी या चित्रपटसृष्टीत टिकून राहणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही. मात्र मला माझा स्वतःवर खूप विश्वास आहे.हाच विश्वास मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी कायम मदत करतो. कधीही मला आत्मविश्वास ढळतो असं वाटतं त्यावेळी मी मनःशांती, ध्यान करते आणि लिखाणही करते. त्यामुळे मला लिहायलाही खूप आवडतं असे ती म्हणाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.