Take a fresh look at your lifestyle.

नेहा कक्करचा पती गायक रोहनप्रीतच्या मौल्यवान वस्तू लंपास; पोलिसांत तक्रार दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिचा पती आणि गायक रोहनप्रीत सिंग याच्याबाबतीतली मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या वैयक्तिक आणि मौल्यवान वस्तूंची एका हॉटेलमधून चोरी झाली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील एका हॉटेलमध्ये दरोडा पडला होता आणि त्या ठिकाणी रोहनप्रीत थांबला होता. या घटने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी याचा तपास सुरू केला असून तपासात समोर आले आहे कि, रोहनप्रीतच्या रूममधून हिऱ्याची अंगठी, आयफोन आणि अॅपल घड्याळ चोरी झाले आहे.

मंडीचे पोलिस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी ‘एएनआय’ वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितलं कि, “मंडीतील एका हॉटेलमधून रोख रक्कम, आयफोन, स्मार्टवॉच आणि पंजाबी गायक रोहनप्रीत सिंग याची हिऱ्याची अंगठी यासह काही वैयक्तिक सामान चोरीला गेले आहे. याप्रकरणी रोहनप्रीत याने पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने या घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. ज्यामध्ये लंपास झालेल्या वस्तूंची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

बॉलिवूड गायिका नेहा कक्कर आणि पंजाबी गायक रोहनप्रीत यांनी डिसेंबर २०२० मध्ये लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय आणि मित्र परिवार मोठ्या संख्येत उपस्थितीत होता. मीडिया रिपोर्टनुसार, नेहा आणि रोहन यांची एका म्युझिक व्हिडिओदरम्यान पहिल्यांदा भेट झाली आणि या भेटीनंतर त्यांच्यात मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. नेहा बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायिका आणि रोहनप्रीत पंजाबी गायक आहे. दोघांनाही सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.