Take a fresh look at your lifestyle.

हे काय.. ? हा तर फुल्ल ड्रामा; राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या इश्क मुमेंटचा लोकांनी केला पंचनामा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गायक राहुल वैद्य याने ‘बिग बॉस सीजन १४’मूळे प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळवली. त्यानंतर तो लवकरच ‘खतरों के खिलाडी ११ मध्ये स्टंट करताना दिसणार आहे. यासाठी तो नुकताच केपटाऊनला रवाना झाला आहे. दरम्यान दिशा राहुलला जाताना पाहून जरा जास्तच भावुक झाली असता तो तिला समजावू लागला. एकंदर विमानतळावर एकमेकांना निरोप देताना त्यांची झालेली अवस्था निव्वळ ड्रामा असल्याचे म्हणत, अनेकांनी सोशल मीडियावर या कपलला चांगलेच ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

गुरुवारी अर्ध्या रात्री राहुलला विमानतळावर सोडण्यासाठी आलेली दिशा प्रियकर राहुलला सोडायला अजिबातच तयार नव्हती. राहुल कसाबसा तिला समजावताना दिसत होता. कधी तिला मिठीत घेऊन, कधी तिला लाडाने कुरवाळत तिची समजूत घालत होता. बाहेर कॅमेरे या दोघांवर नजर रोखत नुसते लखलखत होते. मात्र एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले राहुल व दिशाला निरोपाचा क्षण जवळ येताच आपल्या भावना रोखता येत नव्हत्या.

कारमध्ये राहुलने दिशाला घट्ट मिठी मारली. तिच्या माथ्याचे चुंबन घेतले, तिचा गालगुच्चा घेतला. यानंतर ते कारबाहेर निघाले आणि एकमेकांना घट्ट मिठी मारली. पुढे राहुलने गुडघ्यावर बसून दिशाला पुन्हा एकदा प्रपोजही केले. अखेर दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला आणि राहुल केपटाऊनसाठी रवाना झाला.

राहुल व दिशाचे विमानतळावरचे हे व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. राहुलने ‘बिग बॉस सीजन १४’च्या घरात दिशा परमारला प्रपोज केले होते. तेव्हापासून दोघांच्या प्रेमाची चर्चा चांगलीच रंगली आहे. गेल्या काही दिवसांत दिशा व राहुल यांना अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले. यावेळी दोघांची रोमॅन्टिक केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली होती. मात्र यावेळी चाहत्यांनी काही अलगच भूमिका दर्शविली आहे.

 

 

विमानतळावर एकमेकांना निरोप देताना त्यांची झालेली अवस्था निव्वळ ड्रामा असल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी हा प्रेमाचा दिखावा नुसता ड्रामा आहे, हे सर्व कॅमे-यासाठी आहे, अशा कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी या कपलला चांगलेच ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.