Take a fresh look at your lifestyle.

गायिका सावनी रवींद्रच्या घरी येणार छोटुसा पाहुणा; सोशल मीडियावर दिली गोड बातमी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायिका सावनी रवींद्र लवकरच आई होणार आहे. तिने नुकतीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना हि गोड अशी आनंदाची बातमी दिली आहे. तिने पती डॉ. आशिष धांडे यांच्यासोबतचे फोटो शेअर करत हि बातमी दिली आहे. तिच्या घरी चिमुकला येणार कि चिमुकली ते तर माहित नाही पण लहानगा पाहुणा येणार आहे, हि केवळ बातमीच उत्साहासाठी पुरेशी आहे. सावनीला नुकताच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार आणि आता ही सानुल्याची गोड बातमी असा आनंदाचा डबल डोस मिळाला आहे. त्यामुळे तिच्यासह तिच्या चाहत्यांचाही आनंद द्विगुणीत झाला आहे.

गायिका सावनी रवींद्रने या गोड आईपणाची भावना व्यक्त करताना म्हटले कि, ”माझ्या मनात सध्या खूप अलौकीक भावना आहेत. ज्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आजवर मी गायिका म्हणून आईपणावर वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत. अंगाईगीत, डोहाळ जेवणाचे गीत, बारश्याची गाणी मी या आधी गायली होती. पण आता मी स्वत: त्या भूमिकेतून जाणार आहे. त्यामुळे आईपण अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला अस वाटतं की प्रत्येक स्त्री ही भाग्यवान असते. कारण ती आई होऊ शकते. आईपण काय असतं हे फक्त एक आईच जाणू शकते आणि सध्या मी मातृत्वाच्या उंबरठ्यावर आहे आणि या फेजचा मी पुरेपुर आनंद घेत आहे.”

पुढे म्हणाली, ”माझं बाळ माझ्यासाठी लकी चार्म आहे. कारण माझं बाळ पोटात असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच गेल्या सहा महिन्यात मी गरोदरपणात अनेक वेगवेगळे म्युझीक अल्बम, नविन गाणी, काही प्रोजेक्टस शूट केलेत. त्यातील बरीचशी गाणी रिलीज झाली. काही गाणी लवकरच रिलीज होतील. मला खूप अभिमान आहे की माझ्या होणा-या बाळाने मला त्या परिस्थितीत अजिबात त्रास दिलेला नाही. आता मी माझ्या बाळाच्या स्वागतासाठी फारचं उत्सुक आहे.”