Take a fresh look at your lifestyle.

सुप्रसिद्ध गायक सोनू निगमने केले विनामास्क रक्तदान; नेटकरी म्हणाले यांना मास्क दान करा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण जगभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्ण संख्यासमोर ऑक्सिजन, रुग्णालयातील बेड आणि औषधांचा साठा अपुरा पडू लागला आहे. यात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे शासनाच्या कडक निबंधाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. दरम्यान सुप्रसिद्ध गायक सोनू निगम याने रक्तदान केल्याचा व्हिडिओ चांगलाच वायरल होतोय. मात्र यावेळी त्यांनी मास्क परिधान न केल्याने नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

गायक सोनू निगम हे मुंबईतील जुहू येथे आदर्श फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यासाठी उपस्थित राहिले होते. या रक्तदान शिबिराचे आयोजन केल्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेत रक्तदान केले. याचा व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. इतकेच नव्हे तर कोरोना लस घेण्याआधी रक्तदान करा, असे आवाहन लोकांना केले आहे.

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. मात्र कौतुकासोबत जिल्ल के लड्डू पण खिलवले आहेत. याचे कारण असे की, सुरवातीला या व्हिडीओमध्ये गायक सोनू निगम चेहऱ्यावर मास्क लावून उद्घाटन करताना दिसून येतोय, लोकांशी गप्पा मारतानाही त्याच्या चेहऱ्यावर मास्क दिसतोय, मात्र जेव्हा तो रक्तदान करतो त्यावेळी त्याने चेहऱ्यावर मास्क लावलेला नाही. यामूळेच सध्या गायक सोनू निगम नेटकऱ्यांचा टार्गेट बनलाय. काही जण याला सोनू निगमचं शो ऑफ असे म्हणत आहेत. तर काही जण याला ‘कुणीतरी मास्क दान करा’, अशी कमेंट करत ट्रोल करतंय.

 

विशेष म्हणजे गायक सोनू निगमला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्याने सोशल मीडियाद्वारे आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. तरी सुद्धा त्याला अद्याप चेहऱ्यावर मास्क लावण्याबाबत गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे. हेच नेमके कारण ठरले त्याला सोशल मीडियावर ट्रॉल करण्याचे. स्वतःला कोरोना होऊनही जर यांना आपल्या सुरक्षेबाबत जाग येत नसेल तर काय बोलणार… ?