प्रख्यात गायक उदित नारायण होणार आजोबा; आदित्य- श्वेताने दिली गुड न्यूज
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टेलिव्हिजन इंडस्ट्रीचा पॉप्युलर होस्ट आणि प्रख्यात गायक उदित नारायण यांचा एकुलता एक लेक गायक आदित्य नारायण लवकरच बाबा होणार आहे. लवकरच त्याची पत्नी श्वेता अग्रवाल चिमुकल्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे नारायण घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय आता उदित नारायण आजोबा होणार म्हणजे गायकीच्या सुरात आणखी एक सूर समाविष्ट होणार. याबाबत आदित्य नारायणने स्वत: इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत माहिती दिली आहे. याशिवाय नुकतेच श्वेताचे बेबी शॉवर झाले असून त्याचे फोटोही पोस्ट करण्यात आले आहेत.
आदित्यने आपल्या चाहत्यांना आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी देताना इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने श्वेतासोबतचा फोटो शेअर केला आहे. यात श्वेता बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय. तसेच आदित्यने या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘मी आणि श्वेता लवकरच आमच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहोत…’ याशिवाय अलीकडे एका मुलाखतीत आदित्यने पत्नीच्या प्रेग्नंसीचा खुलासा केला होता. तेव्हा आदित्यला एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा कि, मुलगी हवी का मुलगा? यावर मुलगी झाली तर मला अधिक आनंद होईल. कारण मुली बाबाच्या खूप क्लोज असतात, असं आदित्य म्हणाला होता.
आदित्यच्या या पोस्टवर अनेक चाहते, प्रियजन आणि कुटुंबीयांनी लाइक्स तसेच कमेंट्सचा वर्षाव करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल हे दोघेही जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट करत होते. यानंतर त्यांनी १ डिसेंबर २०२० रोजी लग्नगाठ बांधली. त्यांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरात कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले होते. माहितीनुसार, शापित चित्रपटाच्या सेटवर आदित्य आणि श्वेताची भेट झाली. त्यांनी हा चित्रपट एकत्र केला होता. दरम्यान त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.