Take a fresh look at your lifestyle.

जमलं हो जमलं! गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर लग्नबंधनात अडकणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील गाजलेले कपल आता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर याना कोण ओळखत नाही. जेव्हा जेव्हा जिथे जिथे शक्य आहे तिथे हे आपल्या प्रेमाला व्यक्त करायला न घाबरणारे एक बिनधास्त कपलं आहे. जे लवकरच आता अधिकृत विवाह बंधनात अडकणार आहे. नुकतेच त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत. त्यानंतर हि दोघे कधी लग्न करणार याबाबत चाहतेदेखील उत्सुक आहेत. अखेर त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून गायिका जुईली जोगळेकर आपल्या इंस्टाग्रामवर रोहित राऊत सोबतचे फोटो शेअर करताना दिसतेय. नेहमीप्रमाणे फोटो चर्चेत आहेतच. पण यावेळी फोटोंपेक्षा कॅप्शन जास्त चर्चेत आहेत. कारण यातूनच तिने लग्नाबद्दल सांगितले आहे. तिने म्हटले की, चला. दहा दिवस बाकी आहेत. यावरून अर्थातच येत्या २३ जानेवारी २०२२ रोजी रोहित आणि जुईली लग्नबंधनात अडकणार आहेत असे म्हणायला हरकत नाही. शिवाय रोहित आणि जुईलीच्या केळवणाचे फोटोदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. या फोटोंवरून ते लवकरच लग्न करणार आहेत अश्या नुसत्या चर्चा सुरु होत्या. पण कॅप्शनने सगळे प्रश्नच संपवले.

झी मराठी वाहिनीवर २००९ साली ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा पहिला सीझन आला होता. रोहित राऊत पहिल्या पवार्चा विजेता ठरला होता. त्यानंतर रोहितने गायक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. याच शोमध्ये जुईली जोगळेकरदेखील स्पर्धक म्हणून सहभागी होती. तेव्हापासून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची एकमेकांशी ओळख झाली. यानंतर त्यांच्या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत आणि मग काय? मैत्रीतून प्रेमात. यानंतर दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली दिली होती.