Take a fresh look at your lifestyle.

हॅशटॅग आयला रे आयला ; सिंघम- सिंबा- सूर्यवंशी’चे ट्रायो एनर्जेटिक सॉन्ग ट्रेंडींवर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। खूप प्रतीक्षेनंतर आता राज्यातील चित्रपटगृहे खुली करण्यात येत असल्यामुळे नव्या नव्या चित्रपटांची जणू रांगच लागली आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचे कितीतरी चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. यात बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचा समावेश आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे प्रमोशन सुरु झाले असून यातील गाणी रिलीज करण्यात आली आहेत. यातील पहिले गाणे २१ ऑक्टोबर रिलीज केले आहे. सर्वत्र पहिल्याच गाण्याने जबरदस्त धूम केली आहे. याचे कारण असे कि या गाण्यात सिंघम अर्थात अजय देवगण, सिंबा अर्थात रणवीर सिंग आणि सूर्यवंशी अर्थात अक्षय कुमार हा ट्रायो दिसत आहे. मग काय चर्चा तर होणारच ना!

सूर्यवंशी हा चित्रपट येत्या ५ नोव्हेंबर २०२१ रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चित्रपटाच्या पहिल्या गाण्याची जबरदस्त चर्चा सुरु आहे. अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रपटातील गाण शेअर केल आहे. या गाण्याचं नाव ‘आयला रे आयला’ असून हे गाणं अक्षयच्या ‘खट्टा मिठ्ठा’ या चित्रपटातील आहे. या गाण्यात अक्षय – अजय- रणवीर तिघेही दिसत आहेत.

अक्षयने ‘हे गाणं शेअर करत ‘जेव्हा सिंघम, सिंबा आणि सुर्यवंशी एकत्र येतात तेव्हा उत्सव होतो’, असे कॅप्शन दिले आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्याच्या अवघ्या १३ मिनिटांमध्ये १ लाख पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी हे गाणं पाहिलं होत. तर यानंतर अजूनही याच गाण्याची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर तर ट्रेंडिंग गाण्यांपैकी एक गाणे झाले आहे.

माहितीनुसार ‘सुर्यवंशी’च्या प्रमोशनला दणक्यात सुरुवात केली आहे. आता लवकरच या चित्रपटातील दुसरे गाणे प्रदर्शित होणार आहे. हे गाणे अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ या दोघांवर चित्रित करण्यात आले आहे. ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र अखेर आता चित्रपटगृहे खुलल्यामुळे सर्व निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि सेट क्रू यांनी मोकळा श्वास घेतला आहे.