Take a fresh look at your lifestyle.

बॉडीगार्डच्या बर्थडे’ला सिंघमची हजेरी; वाढलेली दाढी पाहून चाहते झाले कनफ्युस्ड

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगण त्याच्या मनस्वी आणि दिलदार स्वभावासाठी ओळखला जातो.याशिवाय त्याचे लूक त्याच्या चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस पडत असतात. नुकताच अजयने आपला बॉडीगार्ड गौतम याच्या वाढदिवसाचा घाट घालून स्वतः उपस्थिती दर्शविली होती. यामुळे त्याचा बोदयगार्ड तर जाम खुश झाला पण चाहते मात्र थोडे कनफ्युस्ड झाले. कारण अजयचा बदलेला लूक फारच वेगळा होता. यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याचा नवा ढाढी वाढलेला लूक चांगलाच चर्चेत आहे.

सिंघम चित्रपटापानंतर अजयला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. हा चित्रपट त्याच्या करिअरला वेगळे वळण देणारा ठरला. अजयचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. अजयच्या अभिनयासोबत तो माणसांना देत असलेली आपुलकीची वागणूक त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवते. नुकताच त्याने बॉडीगार्ड गौतमचा वाढदिवस साजरा केला आहे. दरम्यानचे फोटो गौतमने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ह्या फोटोत अजयने काळ्या रंगाचे टी शर्ट घातले आहे. तर वाढलेल्या त्याच्या पांढऱ्या दाढीसोबत काळ्या रंगाचा गॉगल आणखी वेगळा दिसतो आहे. तो त्याच्या या कुल लूकमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोंसोबत बॉडीगार्ड गौतमने लिहिले कि, बॉसबरोबर आजचा जन्मदिवस साजरा केला त्याचा आनंद आहे. आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे. माझा आजचा दिवस संस्मरणीय केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.

अजयने आतापर्यंत मिशा वाढवल्या होत्या पण दाढी कधीही वाढवली नव्हती. त्यामुळे या लूकची बरीच चर्चा सुरु आहे. या दाढीवाल्या लूकमध्ये अजयला बघितल्यावर अजयच्या चाहत्यांनी तो आजारी तर नाही ना असे प्रश्न विचारले आहेत. तर त्यांच्यासाठी आम्ही सांगू इच्छितो कि, तो पूर्णपणे स्वस्थ आहे आणि ही वाढवलेली दाढी लॉकडाऊनचा परिणाम आहे. शिवाय अजयने हा लूक त्याच्या आगामी ‘थॅंक गॉड’ या चित्रपटासाठी राखून ठेवला आहे. अजय त्याच्या भूमिकेवर नेहमीच खूप कष्ट घेत असतो. त्यामुळे त्याच्या नव्या लूकसाठी त्याने दाढी वाढवली आहे. या व्यतिरिक्त अजय ‘भुज द प्राईस ऑफ इंडिया’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय आरआरआर या दाक्षिणात्य सिनेमातही अजय झळकणार आहे. दुसरीकडे ‘मे डे’ नावाच्या चित्रपटातून तो दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.