Take a fresh look at your lifestyle.

…तर देशात शांती टिकणार नाही; उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येवर कंगना रनौत संताप

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गडचिंचले येथे जमावानं तीन साधूंची हत्या केली होती. अशीच काहीशी घटना आता उत्तर प्रदेशातील मेरठ येथे घडली आहे. तेथील एका साधूंवर जमावाने लाठी हल्ला करत त्यांची हत्या केली आहे. या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने संताप व्यक्त केला आहे. “निर्दोष संतांच्या हत्या थांबल्या नाही तर तुम्हाला शाप लागेल” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

“भगवे वस्त्र परिधान करणाऱ्या आणखी एका साधुंची जमावाने हत्या केली. या निरपराध अध्यात्मिक साधकांची हत्या थांबविली नाही तर आपण दु:ख भोगत राहू. देशात शांती टिकणार नाही.” अशा आशयाचे ट्विट करुन कंगनाने आपला राग व्यक्त केला आहे. तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

कंगना रनौत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती बिनधास्त प्रतिक्रिया देत असते. यापूर्वी तिने सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूवरुन बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधला होता

Comments are closed.