Take a fresh look at your lifestyle.

तुम्ही मूर्ख आहात काय..?; भाईजानसोबत लग्नाच्या चर्चा पाहून सोनाक्षीचा चढला पारा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याच लग्न जणू युनिव्हर्सल चर्चा झाली आहे. पण तो काही लग्न करेना. तर दुसरीकडे त्याच्या लग्नाच्या चर्चा काही थांबायचं नाव घेईन. याआधी कितीतरी वेळा सलमानचे लग्न झाल्याच्या चर्चा उठल्या. कितीतरी अभिनेत्रींसोबत त्याच लग्न झाल्याच्या चर्चानी सोशल मीडिया गाजवला. यानंतर आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत त्याचं लग्न झाल्याच्या चर्चेला उधाण आलंय आणि त्याच कारण ठरलंय सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो. ज्यामध्ये सलमान आणि सोनाक्षी वेडिंग लूकमध्ये दिसत आहेत. गेल्या कितीतरी दिवसांपासून या चर्चा थांबत नाहीत हे पाहून आता सोनाक्षीने नेटकऱ्यांवर चांगलाच ताव काढलाय.

व्हायरल फोटोंमध्ये सलमान खान सोनाक्षीला अंगठी घालत आहे असे दिसतेय. तर या फोटोत सोनाक्षी आणि सलमानची जोडी अगदी नवविवाहित जोडप्यासारखी दिसतेय. या फोटोमध्ये सलमानने पांढरा शर्ट आणि जॅकेट घातलं आहे. तर सोनाक्षीने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. आता हे सगळं लोभसवाणं दिसत असलं तरी या फोटोकडे बघितल्यावर सहज कळत आहे की कुणीतरी या फोटोला एडिट केलं आहे आणि व्हायरल केलं आहे. त्यामुळे अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा हा वेडिंग फोटो फेक आहे सिद्ध होतंय आणि तरीही तो फोटो खूप व्हायरल केला जात आहे.

हा फोटो पाहून सलमान आणि सोनाक्षीची जोडी चाहत्यांना इतकी भुरळ घालताना दिसली कि व्हायरल होण्याचा सिलसिला काही थांबेनाच. पण आता कुठेतरी पूर्ण विराम हवा म्हणून सलमान आणि सोनाक्षीच्या व्हायरल फोटोवर खुद्द सोनाक्षीनं प्रतिक्रिया दिली आहे. सोनाक्षीनं एक पोस्ट करुन लिहीलं, तुम्ही मुर्ख आहात का? खऱ्या आणि खोट्या फोटोमध्ये तुम्ही साधा फरकही नाही करू शकत. सोनाक्षीनं तिच्या या दोन ओळीसोबत एक हसणारा इमोजी देखील टाकला आहे. आता सोनाक्षी सिन्हाची प्रतिक्रिया हसण्याजोगी नाही हे तर कुणीही समजून जाईल.