Take a fresh look at your lifestyle.

ती अंगठी साखरपुड्याची नव्हती..?; सोनाक्षीच्या व्हिडिओ पोस्टने केला मोठा खुलासा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा साखरपुडा झाला अशी जोरदार चर्चा सुरु होती. आता हि चर्चा सुरु होण्याला खुद्द सोनाक्षीचं जबाबदार होती. कारण तिने सोशल मीडियावर बोटात डायमंड रिंग असलेले फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून तीने गुपचूप साखरपुडा उरकला आहे असेच वाटत होते. पण या फोटोत तिने हात धरलेली व्यक्ती आहे कोण..? हा प्रश्न अनुत्तरीतच होता. पण तरीही लोकांनी अंदाज लावल्याप्रमाणे तो तिचा बॉयफ्रेंड असेल अशीही चर्चा होती. अशा अनेक विविध प्रकारच्या चर्चानी सोशल मीडिया गाजत होता. यानंतर अखेर आता अभिनेत्री सोनाक्षीने एक व्हिडीओ पोस्ट करीत या सर्व प्रश्नांचे एक उत्तर दिले आहे.

या बातम्यांवर खुलासा करताना सोनाक्षीने तिच्या काही चाहत्यांना खुश केलय तर काही चाहत्यांना मात्र नाराज. त्याचं काय आहे, मिस्ट्री मॅनसोबत सोनाक्षीच्या साखरपुड्याची बातमी व्हायरल झाली पण या बातमीत तथ्य नाही असे तिने स्वतःच सांगितलं. खरं तर सोनाक्षीने आर्टिफिशियल नेल ब्रॅंड लॉंच केला आहे. होय. नेलं ब्रँड. तिने चाहत्यांसोबत ही गूडन्यूड सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. सोनाक्षीने SOEZI नावाचा आर्टिफिशियल नेल ब्रॅंड सुरु केला आहे.

यामुळे आता सोनाक्षी प्रत्यक्ष आयुष्यात उद्योजिका म्हणूनही नाव कमावतेय. काही दिवस आधी सोनाक्षीच्या व्हायरल फोटोमध्ये ती साखरपुड्याची अंगठी दाखवत नव्हतीच. तर ती आपल्या नेलब्रॅन्डचं प्रमोशन करत होती. तूर्तास सोनाक्षीने लग्नाच्या विषयावर काहीही स्पष्टीकरण दिले नसले तरीही SOEZIच्या माध्यमातून तिने साखरपुड्याच्या बातमीवर पडदा टाकला आहे.

आजकाल आर्टिफिशियल नेलचे तरुणींमध्ये विशेष आकर्षक आहे. तर अशा मुलींसाठी सोनाक्षीने हे नेल ब्रॅंड आणले आहे. तरुण मुलींची आवड लक्षात घेऊन सोनाक्षीने SOEZI ब्रॅंडच्या आर्टिफिशियल नेल ब्रँड आणले आहे. शिवाय याच्या किमतीदेखील कमी ठेवल्या आहेत. म्हणजेच सोनाक्षी सिन्हाच्या ब्रँडेड आर्टिफिशियल नेल्सची किंमत खूप महाग नाही तर परवडण्याजोगी आहे.

तिने या आर्टिफिशियल नेल्सच्या किमती कमी ठेवून मुलींना खुश होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यामुळे सध्या तरी सोनाक्षी लग्न कधी करेल यापेक्षा तीने नवा बिजनेस चालू केलाय यातच आनंद. तिचा बिझनेस खूप मोठा व्हावा यासाठी खूप शुभेच्छा!