Take a fresh look at your lifestyle.

चंद्राच्या तालावर थिरकली अप्सरा; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ओनलाईन। मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. येत्या २९ एप्रिल २०२२ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात लावण्यवती चंद्रा आणि राजकारणी दौलतराव यांची आगळी वेगळी बहारदार प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांना घायाळ करताना दिसतेय तर दुसरीकडे दौलतरावाच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे शोभतोय. दरम्यान या चित्रपटातील चंद्रा हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. इंस्टावर एकामागे एक रील शेअर होत असताना आता मराठी सिनेसृष्टीतील अप्सरेलाही चंद्रमुखीची भुरळ पडली आहे.

आपल्या मोहक नजाकतीने अमृताने चंद्रा गाण्यात चार चांद लावले आहेत. यानंतर हे गाणे सोशल मीडियावर इतके चर्चेत आहे कि जो तो यावर रिल्स बनवतोय. मग अशावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मागे राहील तरी कशी..? एकतर लावणीवर प्रचंड प्रेम आणि गाण्याची लयबद्धता इतकी अप्रतिम आहे कि सोनालीसुद्धा यावर थिरकण्याचा मोह आवरू शकली नाही. तिने सोशल मीडियावर या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनालीतील अप्सरा चंद्राच्या रूपात पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सोनालीचे भरपूर चाहते आणि फॉलोवर्स असल्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. इतकेच नव्हे तर ट्रेंडिंग व्हिडीओजमध्ये या व्हिडिओचा समावेश आहे.

या व्हिडिओमध्ये सोनालीने काष्टा पद्धतीची मरून रंगाची ट्रेंडी फॅशनेबल साडी आणि त्याला साजेसे दागिने परीधान केले आहेत. आधीच तिच्या सौंदर्याने घायाळ होणाऱ्यांची कमी नाही. त्यात कमालीच्या अदांनी कित्येक बेजार झाले असतील ते सांगायलाच नको. सोनालीच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांचा समावेश आहे. अगदी सुबोध भावे, अमृता सुभाष, सायली संजीव, स्पृहा जोशी आणि अजून बरेच. याशिवाय चंद्रमुखी चित्रपटाचे प्रस्तुत करते प्लॅनेट मराठी आणि अक्षर बद्रापूरकर यांनीही कमेंट करीत सोनालीचे कौतुक केले. तसेच तिच्या शुभेच्छांसाठी आभारही मानले आहेत.