Take a fresh look at your lifestyle.

डुबुक डुबुक! सोनाली कुलकर्णीची पाण्यात उंचावरून उडी; मॅक्सिकोत करतेय धमाल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अतिशय सुंदर दिसणारी मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. यामुळे तिचा चाहता वर्ग सोशल मीडियावर तिला फॉलो करताना दिसतो. ती नेहमीच विविध लूकमधील विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिचे फॉलोवर्स पाहता तिची पोस्ट लाईक आणि कमेंट्सशिवाय सुनी राहिली तर आश्चर्यच. अलीकडेच लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनालीने पुन्हा एकदा विधिवत आपल्या पतीशी अर्थात कुणाल बेनोडेकर याच्याशी विवाह केला आहे. यानंतर सोनाली मॅक्सिकोच्या निसर्गरम्य ठिकाणांचे सौंदर्य वाढविताना दिसत आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ती उंचावरून पाण्यात उडी मारताना दिसते आहे.

सोनालीने हा व्हिडीओ तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शन दिले आहे. ज्यात सोनालीने लिहिलंय कि, #cancun मध्ये असताना हे साहस करणे चुकवू नका! #सेनोट या #नैसर्गिक #सिंखोलमध्ये उडी मारणे आणि पोहणे खूपच मजेदार आहे. हे भूजल उघडकीस आणणाऱ्या चुनखडीच्या खडकाच्या पडझडीमुळे उद्भवते! या व्हिडिओमध्ये सोनाली छान अशा स्विमवेअरमध्ये दिसते आहे. शिवाय उंचावरून उडी मारणे मजेचे वाटत असले तरी भीती वाटत असल्याचे ती या व्हिडिओमध्ये सांगताना दिसतेय.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच मस्त आणि बिंधास्त जगणे पसंत करते. यामुळे तिची स्वतःची अशी भन्नाट लाइफस्टाइल आहे. गेल्या वर्षभरात सोनालीने अतिशय वेगाने प्रगती केल्याचे दिसून आले आहे. आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत आता सोनाली कुलकर्णी हे नाव आवर्जून घेतले जाते. कारण झिम्मा असेल किंवा पांडू हाऊसफुल्लची पाटी जोरदार चालली आहे. याशिवाय सोनालीचा चित्रपट येतोय इतकं समजलं तरीही चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली दिसते. आता लवकरच येत्या २४ जून २०२२ रोजी सोनालीचा तमाशा लाईव्ह चित्रपट येतोय. अलीकडेच या चित्रपटाचे पहिले गाणे आणि ट्रेलर रिलीज झाला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत राहिला.