Take a fresh look at your lifestyle.

सोनालीने सासरी बनवली तांदळाची खीर; उखाण्याचं कॅप्शन देत फोटो केला शेअर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अलीकडेच तिच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण झालं आहे. कोरोनाच्या काळात गडबडीत लग्न केल्यामुळे आता वर्षपूर्तीच्या निमित्ताने सोनालीने पती कुणाल बेनोडेकर यांच्यासोबत विधिवत लग्नगाठ बांधली आहे. यानंतर ती नवऱ्यासोबत हे दुसरं लग्न करुन हनिमूनसाठी मेक्सिकोला गेली होती. त्यांच्या हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर ती सतत शेअर करत होती. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच गाजले. यानंतर आता सोनालीने हनीमूननंतर सासरच्या मंडळींना खुश करायला सुरुवात केली आहे. रितीनुसार, सोनालीने पहिला गोड पदार्थ आणि हटके उखाणा घेतलाय बरं. त्याचा फोटो आणि कॅप्शन चांगलाच व्हायरल होतोय.

एरव्ही हॉट लुक मध्ये दिसणारी सोनाली या फोटोत चक्क ड्रेसमध्ये दिसतेय. गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, कपाळाला कुंकू अशी सोनालीची अदा याहीवेळी चर्चेत आहे. तिला सुंदर आणि अतिशय साधा अंदाजच कदाचित तिच्या चाहत्यांना नेहमी भावतो. या फोटोत सोनालीच्या हातात खिरीने भरलेल्या वाट्या दिसत आहेत. सोनालीने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना छानसा उखाणा लिहिलेलं कॅप्शन दिलंय. जे चांगलच चर्चेत आलं आहे. तिने लिहिलंय कि, ‘सासरी केलेला पहिला पदार्थ, तांदळाची खीर” यासोबत उखाणा लिहिलाय कि, ‘लग्नविधींनंतर घातलेल्या मंगळसूत्राच्या उलट्या वाट्या.. कुणालच्या घरच्यांसाठी आणल्या तांदळाच्या खीरीने भरलेल्या वाट्या.’

सोनाली या व्हिडिओत अतिशय सुंदर आणि सालस गृहिणी वाटतेय. त्यात सोनालीने पहिल्यांदाच सासरी स्वयंपाक बनवला आहे. त्यामुळे याचा फोटो शेअर करत असताना सोनालीचाही आनंद काही वेगळा होता असेल यात काहीच वाद नाही. सध्या सोनाली तिच्या सासरी अर्थातच तिच्या पतीच्या घरी लंडनमध्ये आहे. तिचा पती कुणाल बेनोडेकर हा लंडनमध्येच राहतो. त्यामुळे सोनालीदेखील आता लंडनमध्ये आहे. पण परदेशी जाऊनही ती आपल्या कुटुंबासोबत भारतीय रीतिरिवाज करणे विसरलेली नाही. याचाच आनंद तिच्या चाहत्यांमध्ये दिसून येतोय. याचा प्रत्यय कमेंट बॉक्समध्ये पडणाऱ्या कमेंट्समधून येईल.