Take a fresh look at your lifestyle.

सोनालीच्या कमेंटनं ट्विटरवर ‘धुरळा’!!

मुंबई – मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची नायिका सोनाली कुलकर्णीनेही जेएनयुतील हल्ल्याचा निषेध नोंदवत सरकारवर निशाणा साधला. विशेष म्हणजे सोनालीने एकाच दगडात दोन पक्षा मारले, असे म्हटले तर वेगळे ठरणार नाही.

नागरिकत्व दूरस्ती कायद्यावरुन देशातील वातावरण चिघळले होते. देशातील तरुणाई आणि अल्पसंख्याक नागरिक रस्त्यावर उतरुन सीएए कायद्याला विरोध करत होते. मात्र, जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांवर हिंदू रक्षा दलाकडून हल्ला करण्यात आला अन् सीएएचा मुद्दा काहीसा मागे पडला. मात्र, जेएनयुवरील हल्ल्याचा संदर्भ देत नटरंगफेम सोनाली कुलकर्णीने केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारने नुकताच नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेत पारित केला आहे. त्यानुसार, इतर देशातील अल्पसंख्यांकांना नागरिकता देण्यात येणार आहे, सोनालीने हाच मुद्दा ठेवून करत सरकारला लक्ष्य केलं.

”तुम्ही देशातील विद्यार्थ्यांना सुरक्षा देऊ शकत नाहीत, अन् दुसऱ्या देशातील अल्पसंख्यांना सुरक्षा देण्याच्या गोष्टी करता” असे ट्विट सोनालीने केले आहे. आपल्या ट्विटमधून सोनालीने जेएनयुवरील हल्ल्याचा एकप्रकारे निषेध करताना, सीएए कायद्यावरही टीका केली आहे. अभिनेत्री सोनालीनेही स्पष्ट भूमिका घेत जेएनयुतील हल्ल्यावरुन सरकारला लक्ष्य केलं.

सोनालीच्या ट्विटवरही अनेकांनी कमेंट केल्या आहेत.नुकताच सोनाली कुलकर्णीचा धुराळा हा चित्रपट रिलीज झाला आहे. तसेच, मी धुरळा पाहायला जाणार होतो, पण आता जाणार नाही, अशीही कमेंट एकाने केली आहे.