Take a fresh look at your lifestyle.

सोनालीने लंडनमध्ये बेनोडेकर कुटुंबासोबत केलं ख्रिसमस सेलिब्रेशन; पहा खास फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठमोळी क्लास अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि आताची मिसेस बेनोडेकर नेहमीच आपल्या खास आणि भन्नाट फोटो व्हिडीओतून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. त्यामुळे सोनाली प्रेक्षकांच्या दुनियेतील एक लाडकी अभिनेत्री ठरली आहे. तिच्या सौंदर्याने तर अनेक तरुण घायाळ केले पण सोनाली मात्र कुणाल यांच्या प्रेमात पडली आणि तीच सार जग बेनोडेकर कुटुंब झालं. त्यामुळे यंदाचा ख्रिसमस आणि न्यू ईअर ती आपल्या सासरच्या मंडळींसोबत एन्जॉय करणार आहे.

पांडू चित्रपटामुळे अलीकडेच सोनालीने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असताना तिच्या सोशल मीडियावर पहाल तर तिने नवं फोटोशूट केल आहे हे तुमच्या लक्षात येईल.

यावर तिच्या चाहत्यांनी अगदी नेहमीप्रमाणे कौतुकाचा आणि प्रेमाचा वर्षाव केला आहे . यानंतर नुकतेच शेअर केलेले फोटो पहाल तर आपली लाडकी अप्सरा ख्रिसमस ट्री आणि तिच्या अहोंसोबत दिसेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

हे फोटो सोनालीच्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे आहेत. सोबत तिने माऊचाही व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात बेनोडेकरांची मनी ख्रिसमस ट्रीवर फिरणाऱ्या ट्रेनकडे कुतूहलहाने पाहतेय. हा मजेशीर व्हिडीओ असून खुप लोकांनी लाईक केलाय.

सोनालीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती तिच्या सासरच्या मंडळींसोबत दिसतेय. सोनालीच्या काही फोटोंमध्ये ती कुणाल यांच्यासोबत दिसत आहे. सोबत ख्रिसमस ट्री सुद्धा दिसतोय. या फोटोजआधी तिने अगदी एअरपोर्टवर कुणाल घ्यायला आल्याचेही फोटो शेअर केले आहेत. यातील प्रत्येक फोटोची खासियत माहितेय का? या फोटोंची एकच खासियत आहे की सोनाली खूप आनंदात आहे आणि यामुळे तिचे चाहते सुद्धा तिला आनंदी पाहून आनंदी झाले आहेत हे त्यांच्या कमेंट्स वरून दिसतंय.