Take a fresh look at your lifestyle.

यंदा कर्तव्य आहे..! बर्थडे गर्ल सोनाली कुलकर्णी अडकणार याचवर्षी विवाहबंधनात

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज आपला ३३वा वाढदिवस साजरा करतेय. आपल्या मोहक अदा आणि घायाळ करणाऱ्या नजरेमूळे सोनालीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अनेकजण तर तिच्या चक्क प्रेमात आहेत. पण सोनाली मात्र कुणाल बेनोडेकर याच्या प्रेमात आहे. गतवर्षी या दोघांचा साखरपुडा देखील संपन्न झाला. त्यानंतर कित्येकांची मन तुटली. आता सोनाली आणि कुणाल यांचा याचवर्षी विवाह संपन्न होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे तिच्या प्रेमी आणि चाहत्यांनो तुटलेलं मन घेऊन तिला शुभेच्छा देण्यासाठी तयार राहा.

तसे पाहता मराठी चित्रपटसृष्टील बरेच सेलिब्रेटी गेल्यावर्षी विवाहबंधनात अडकले आहेत. दरम्यान मागील वर्षी सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा देखील पार पडला होता. त्यामुळे ती कधी लग्न करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते गेल्या वर्षभरापासून उत्सुक आहेत. सोनालीने मागील वर्षी कुणाल बेनोडेकर याच्यासोबत २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत साखरपुडा केला होता. पण सोनालीने तिच्या वाढदिवशी म्हणजे बरोबर एक वर्षापूर्वी तिच्या साखरपुड्याची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली होती.

सोनाली आणि कुणाल यांची भेट लंडनमध्ये नातेवाईकांच्या कार्यक्रमात झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. कुणालने सोनालीला प्रपोज केले होते. त्यावर सोनालीने त्याला होकार दिला. कुणाल दुबईत एका मोठ्या हुद्दयावर वित्तीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. कुणालचे कुटुंब लंडनमध्ये स्थायिक असून सोनलीचे कुटुंब भारतवासी आहे. यामुळे त्यांनी दुबईत साखरपुडा केला होता असे सोनालीने सांगितले होते. सोनाली आणि कुणालच्या साखरपुड्याला तब्बल एक वर्ष उलटून गेले आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाबाबत लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान त्यांचा विवाह सोहळा २०२१ म्हणजेच याचवर्षी होणार असल्याच्या बातमीने वेग धरला आहे. तरीही अधिकृतरीत्या सोनालीने याबाबत काहीही खुलासा केलेला नाही. पण फिरत्या बातम्या पाहता तिचा विवाह सोहळा कधी, कुठे आणि कसा संपन्न होईल याचा कुणीही अंदाज लावू शकत नाही. कुणास ठाऊक जसे गेल्यावर्षी वाढदिवशी तिने साखरपुडा झाल्याचे सांगितले तसे आज लग्न झाल्याचे सांगेल.