Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूड सिंगर शानची आई गायिका सोनाली मुखर्जी कालवश; सोशल मीडियावर दिली माहिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय गायक शानवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इंडस्ट्री शोककाळ अवस्थेत असताना आणखी एक दुःखद बातमी पचविणे सर्वांसाठीच कठीण झाले आहे. बॉलिवूड गायक शानची आई सोनाली मुखर्जी यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. त्या स्वतः एक उत्तम गायिका होत्या. माहितीनुसार बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र मुख्य बातमी अशी कि त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शानच्या आईचे निधन हि बातमी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत शोकदायक आहे.

शानची आई आणि प्रसिद्ध गायिका सोनाली मुखर्जी या स्वतः एक उत्तम गायिका होत्या. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये त्यांचे असे विशेष स्थान आहे. विशेष सांगायची बाब म्हणजे शान केवळ १३ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर घराची आणि मुलाची सर्व जबाबदारी त्याच्या आईने अर्थात सोनाली मुखर्जी यांनी खांद्यावर घेतली आणि उत्तमरीत्या पेलली. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या गायन कौशल्याच्या जोरावर गाणे गौण मुलांना वाढवले त्यांचे करिअर घडवले. त्यामुळे शान त्याच्या आईच्या खूप जवळ होता. यानंतर आईच्या मृत्यूमुळे शान अतिशय दुखी आहे आणि धक्क्यात असे अशी माहिती मिळत आहे.

शानचा जन्म ३० सप्टेंबर १९७२ रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे झाला. त्याला संगीताचा वारसा त्याच्या घरातूनच लाभला आहे. शानचे कुटुंब पूर्वीपासूनच संगीत जगताशी जोडले असल्यामुळे त्याला संगीताचे बाळकडू मिळाले. त्याचे आजोबा जहर मुखर्जी हे संगीतकार होते आणि वडील मानस मुखर्जी हे संगीत दिग्दर्शक होते. आताच्या घडीला शान बॉलीवूडचा एक प्रसिद्ध गायक आहे. त्याने अनेक हिंदी गाण्यांना आपला सुमधुर आवाज दिला आहे. शिवाय शान त्याच्या करिअरमध्ये अनेक सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसला आहे. तसेच गायक असण्यासोबतच तो एक चांगला होस्ट आणि टीव्ही प्रेझेंटर आहे. तरुण वयातच शानने गायला सुरुवात केली. यानंतर २००३ साली त्याने राधिका मुखर्जी सोबत लग्न केले.