Take a fresh look at your lifestyle.

सोनू सूदला सतावतेय युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची चिंता; ट्विटमधून सरकारला केली ‘हि’ विनंती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु असून या युद्धात मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीवित हानी झाल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार युक्रेनमध्ये मोठ्या संख्येत भारतीय देखील आहेत आणि त्यांच्या जीवालाही धोका असल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेदेखील रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह सुमारे १८,००० भारतीयांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सोबतच या लोकांना बाहेर काढण्यासाठी सरकारने पर्यायी मार्ग शोधावा, असे आवाहन सोनू सूदने केले आहे. सोबतच त्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठीदेखील प्रार्थना केली आहे.

सोनूने सोशल मीडिया ट्विटरवर एक ट्विट करीत सरकारला विनंती केली आहे. या ट्विटमध्ये सोनुने लिहिले कि, “युक्रेनमध्ये अडकलेल्यांमध्ये १८००० भारतीय विद्यार्थ्यांसह अनेक कुटुंबे आहेत. मला आशा आहे की, सरकार त्यांना परत आणण्यासाठी सर्व वाजवी प्रयत्न करेल. परंतु मी अजूनही भारतीय दूतवासास तेथे अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर शोधण्याचे आणि त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग शोधून काढण्याची विनंती करतो असे सोनू सूदने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे

सोनू सूदचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आणि व्हायरल होताना दिसत आहे. हे ट्विट व्हायरल होताच सोनू सुदचे चाहते आणि सोशल मीडिया युजर्सनी त्याच्याकडे मदतीची याचना सुरू केली आहे. या ट्विटवर कमेंट करत एका युजरने लिहिलं आहे, ‘कृपया मदत करा’, ‘तुम्ही देवदूत आहात, कृपया मदत करा’, ‘आमच्यासाठी विमान पाठवून द्या सर’ अशी भावनिक साद या कमेंटमधून घालण्यात आली आहे. याशिवाय काही मिम्स आणि काही पोस्टर्स व्हायरल होत आहेत. या मिम्समधून आता सरकारवर टीका करीत सोनू सूडकडे मदतीची याचना केली आहे.