Take a fresh look at your lifestyle.

सोनू सूदला भारतरत्न द्या ; चाहत्याची पंतप्रधान मोदींना विनंती

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | कोरोनामुळे देशभरात लोकडाऊन केल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे तसेच गरीब मजुरांचे प्रचंड हाल झाले. परंतु या सर्व घडामोडीत अभिनेता सोनू सूद कष्टकरी मजुरांसाठी देवदूत बनला होता. सोनू सूद स्थलांतरित कामगारांच्या मदतीला धावून आला होता. त्यानंतर सोनूने मदतीची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येकाच्या हाकेला ओ देत, त्यांची मदत केली. सोनू सूदच्या या कामगिरीने त्याने सर्वसामान्यांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले. आता सोनू सूदच्या चाहत्याने त्याला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी करत थेट पंतप्रधानांना टॅग करत ट्विट केले आहे.

सोमनाथ श्रीवास्तव अस सोनू सूदच्या या चाहत्याचे नाव आहे. सोमनाथ यांनी ट्विट करत सोनू सूदचे (Sonu Sood) कौतुक केले आहे. याच ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत त्यांनी लिहिले की, ‘आदरणीय पंतप्रधान, कोरोना काळात सोनू सूदने गरीब मजूर, विद्यार्थी, शिवाय इतर प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत केली आणि करत आहे. तो देशाचा खरा ‘नायक’ असून, त्याला ‘भारतरत्न’ पुरस्काराने (Bharat Ratna award) गौरवण्यात यावे, अशी आम्हा सर्व देशवासियांची मागणी आहे.’

सोनू सूदने व्यक्त केली कृतज्ञता

या ट्विटमध्ये सोमनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग केले आहे. आपल्या चाहत्यांच्या या मागणीला सोनू सूदनेही प्रतिसाद दिला आहे. ‘हात जोडलेले’ इमोजी देत सोनूने सोमनाथचे ट्विट पुन्हा रिट्विट केले आहे. 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.