Take a fresh look at your lifestyle.

सोनू सूदने फिलिपिन्समधून लोकांना परत भारतात आणले

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | या कोरोना काळात सोनू सूद अथक परिश्रम करत आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात अडकलेल्या मजुरांना आणि परप्रांतीय कामगारांना आपापल्या गावी नेल्यानंतर सोनू आता परदेशात अडकलेल्या लोकांना भारतात आणण्याचे काम करीत आहेत. यासाठी सोनू सूदने स्पाइस जेटशी हातमिळवणी केली आहे. या माध्यमातून तो विमानतळावरून परदेशात अडकलेल्या लोकांना घेऊन येत आहे. सोनूने यापूर्वी किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना परत आणले होते. आता तो फिलिपिन्समध्ये अडकलेल्या लोकांना भारतात आणत आहे.

याबाबत सोनू सूद यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली. फिलिपिन्समधील लोकांचे फोटो त्याने रीट्वीट केले. या फोटोंमध्ये अनेक लोक विमानतळावर सतत दिसतात. हे फोटो शेअर करताना सोनू सूदने लिहिले की, ‘आपणा सर्वांना परत भारतात आणून मला आनंद झाला. मिशन फिलिपिन्सचा पहिला टप्पा पूर्ण झाला. आता दुसरा टप्पा सुरू होईल. जय हिंद. ‘

आगामी काळात सोनू सूद इतर देशांतील भारतीयांनाही परत आणनार आहे. फिलिपिन्सचा दुसरा टप्पा आता सुरू होईल, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. याशिवाय रशिया आणि उझबेकिस्तानमधील लोकांनाही परत आणले जाईल. याशिवाय सोनू सूद वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे.

Comments are closed.