Take a fresh look at your lifestyle.

सोनू सूद पुन्हा धावला मदतीला ; विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी उभारला टॉवर

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात अनेक मजुरांना आणि गरिबांना मदत केली होती. गरीब लोकांसाठी सोनू सूद देवदूत बनला होता. मजुरांना घरी पोचवायचे असो वा ज्यांची नोकरी गेली आहे त्यांना नोकरी देणं असो ..सोनू सूद नेहमीच गरिबांसाठी धावला आणि त्यांचा कैवारी झाला.

सोनू सूदने काही दिवसांपूर्वी चंदीगडमधील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी स्मार्टफोनचे वाटप केले होते, मात्र शिक्षणासाठी मुलांची होत असलेली गैरसोय पाहता हरयाणामधील या विद्यार्थ्यांची सोनूने आणखी एक वेगळी मदत करण्याचे ठरवले आहे. त्याने त्याचा मित्र करण गिल्होत्रा च्या मदतीने एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी मोरनी गावामध्ये मोबाइल टॉवर इन्स्टॉल केला आहे. इंदूज टॉवर्स आणि एअरटेलची कनेक्टिव्हिटी अखंड सुरू ठेवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोनंतर सोनू सूदने ही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मोरनीमधील दापना या गावातील एक विद्यार्थी या फोटोमध्ये झाडाच्या फांदीवर बसून मोबाइल सिग्नल मिळवण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून त्याला त्याचा गृहपाठ पूर्ण करता येईल. या फोटोमध्ये अनेकांनी सोनू सूदला टॅग केले होते.

यासंदर्भात सोनू सूद म्हणाला की, ‘मुलं ही देशाचे भविष्य आहेत आणि त्यांना चांगल्या भविष्यासाठी समान संधी मिळणे आवश्यक आहे. मला असे वाटते की, पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी कुणीही अशा आव्हानांमुळे थांबले नाही पाहिजे. या मुलांना ऑनलाइन क्लासेस घेता यावेत याकरता गावामध्ये मोबाइल टॉवर बांधणे हा माझ्यासाठी एक प्रकारे सन्मान आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.