याला म्हणतात, ‘मसिहा’! पुरग्रस्तांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी सोनू सूदची धडपड; गावोगावी अशी करतोय मदत
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला होता. या दरम्यान अनेको लोकांची कुटुंब उध्वस्त झाली. यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जबर फटका बसला. इतकेच काय तर, अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि दरड दुर्घटनेत रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्येदेखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचे दिसून आले. यामुळे अक्षरशः जगावे का मारावे असा प्रश्न पुरग्रस्तांसमोर उभा ठाकला आहे. सध्या या भागातील लोक केवळ मदतीच्या आशेवर आहेत. असे असताना आता बॉलिवूड अभिनेता आणि कोरोना काळात लोकांच्या मदतीसाठी धावलेला सोनू सूद याने गावक-यांना मदतीचा हात दिला आहे. अनेक गावात अद्याप मूलभूत गरजा असलेल्या जीवनावश्यक बाबी मिळालेल्या नाहीत त्या भागातील लोकांना सोनू सूद मदत करत आहे. सूत्रानुसार चिपळूण, महाड आणि इतर अनेक अंतर्गत भागात लवकरच सोनू सूद मदत पॅकेज पाठवणार आहे. दुधापासून इतर जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेज तयार करून हे गावोगावी वितरित केले जात आहेत.
Messiah Once Again Proved That He Is Messiah❤🇮🇳🙏@SonuSood #SonuSoodMessiah#SonuSood #SonuSoodRealHero@SoodFoundation #Maharashtra #MaharashtraFlood pic.twitter.com/8PTYdHjz2I
— SONU SOOD FC INDIA🇮🇳 (@FcSonuSood) August 6, 2021
याबाबत बोलताना सोनू सूद म्हणतो, “ही गावे पुरामुळे खूपच प्रभावित झाली आहेत आणि ती सर्व प्रमुख महामार्गांपासून २०-३० किलोमीटर दूर आहेत. त्यामुळे तेथे मदत साहित्य पोहोचलेले नाही. आम्ही या गावांच्या सरपंचांशी आधीच बोललो आहोत. मूलभूत गरजा जसे भांडी, कपडे आणि अगदी खाद्यपदार्थ सर्व पाठवले जात आहेत. कुटुंबांना वैयक्तिकरित्या वितरित करण्यासाठी माझी टीम स्वतः तिथे उपस्थित असणार आहे. अन्नधान्याचे काही ट्रक उद्या येतील आणि आणखी काही एक दिवसानंतर येतील. महामार्गालगत बरीच मदत सामग्री आधीच पोहचली आहे, परंतु आतील गावांना अजूनही आवश्यक गोष्टी मिळत नाहीत.
सोनू सूद ने महाराष्ट्र के महाड़ और चिपलून के बाढ़ प्रभावित गांवों में हजारों परिवारों के लिए राहत पैकेज भेजा।
इन परिवारों के लिए लाखों दूध उत्पादों और दैनिक जरूरतों के साथ 7 ट्रक पहुंचेंगे।#SonuSood @SonuSood 🙏 pic.twitter.com/YVuZBEnrNi— Harishsayz (@sonusoodharish) August 6, 2021
सध्या सोनू आणि त्याची मदतकार्य करणारी टीम या आतील गावांपर्यंत पोहोचण्याचा शक्य तितका प्रयत्न करत आहे. यात क्षेत्रपाल, रुद्राणी, दोंडाशी आणि इतर अनेक गावांना मदत साहित्य मिळणार असल्याची माहिती आहे. तर हे मदत साहित्य १००० हून अधिक घरांना पुरवले जाईल आणि मदत साहित्याचा दुसरा ट्रक पुढील ४ दिवसात गावांमध्ये पोहोचेल, अशी माहिती सोनू सूदने दिली आहे. शिवाय, पूरग्रस्त गावकऱ्यांना पुरेसे मदत साहित्य वितरित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे जेणेकरून ते एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊन पुन्हा एकदा आपल्या पायावर उभे राहू शकतील. सूद चॅरिटी फाऊंडेशनची टीम प्रत्येक व्यक्तीला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या गरजू लोकांची मदत करण्यासाठी आपणही प्रयत्न करू या, असे सोनू सूदने इतरांना आवाहन देखील केले आहे.
कोरोनाकाळापासून सुरु झालेले सोनू सूदचे मदत कार्य गतवर्षपासून अद्याप अविरत सुरु आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी कोरोना काळात जन्मलेला मसीहा कुठे गेला असा खोचक सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी केला होता. यानंतर आता सोनू सूद पुरग्रस्तांनाही मदत करत असल्यामुळे टीका करण्यासाठी त्याने काही शेष ठेवलेले नाही, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.