Take a fresh look at your lifestyle.

रक्षाबंधन दिवशी सोनू सूदची आसाममधील ‘त्या’ महिलेला अनोखी भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूमुळे सध्या देशात लॉकडाउनचा काळ सुरु आहे. मात्र या काळातही अभिनेता  सोनू सूद नेहमीच गरिबांना आणि कष्टकरी मजुरांना मदत करताना दिसत आहे.अशातच आता सोनू सूदने एका गरजू महिलेला रक्षाबंधनचं खास गिफ्ट दिलं आहे. विशेष म्हणजे सोनू पुन्हा एकदा गरजुंच्या मदतीसाठी पुढे सरसावल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सोनूने एका गरजू महिलेला घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं आहे. ट्विटरवर
सोनल सिंग या युजरने सोनूला टॅग करत एका महिलेची आर्थिक परिस्थितीमुळे झालेली अवस्था व्हिडीओच्या
माध्यमातून दाखविली होती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोनूने रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून नवीन घर बांधून देईन असं म्हटलं आहे.

सोनल सिंग नावाचा यूज़र म्हणाला कि,सोनू सूद सर हे कुटुंब आसाममधील जलपयीगुडी येथील आहे. या महिलेच्या पतीचं निधन झालं असून या महिलेला एक लहान मुलगा आहे. या मुलाचं पोट भरण्यासाठीही या महिलेकडे काहीच नाही. तसंच पावसाळ्यात या स्त्रीचे अत्यंत हाल होतात. त्यामुळे तुम्हीच एक आशेचा किरण आहात. शक्य असल्याच या कुटुंबाला मदत करा, असं सोनल सिंगने सोनूला टॅग करत म्हटलं होतं.

ट्विट पाहिल्यानंतर चला आज रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी आसाममधील आपल्या बहिणीसाठी नवीन घर बांधुयात, असं रिट्विट सोनू सूदने केलं आहे. विशेष म्हणजे सोनूच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तसंच अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Comments are closed.