Take a fresh look at your lifestyle.

ड्रग्ज प्रकरणामुळे भारती सिंहच्या अडचणीत वाढ ; ‘कपिल शर्मा शो’ मधूनही हकालपट्टी??

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया हे काही दिवसांपासून ड्रगच्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला होता. भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली.
त्यानंतर भारतीला सोशल मीडियावर चाहत्यांच्या टीकेला सोमोरे जावे लागत आहे सर्व स्तरातून भारतीवर आता टिका होऊ लागली आहे. यामुळे सोनी टीव्हीने आता भारतीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे सोनी टीव्हीने भारतीची ‘द कपिल शर्मा शो’मधूनही हकालपट्टी केल्याचे कळते आहे.

आता, भारती कपिल शर्माच्या शोमध्ये कधीही दिसणार नाही. केवळ कपिल शर्मा शोमध्येच नाही तर, भारती आणि तिचा नवरा सोनीच्या कोणत्याही शोमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. या निर्णयामुळे भारतीचा खास मित्र, अभिनेता कपिल शर्मा चिडला असल्याचे कळते आहे. कपिलचे म्हणणे असे आहे की, सोनी टीव्हीने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये भारतीवर बंदी घालू नये.

कपिल शर्माच्या अडचणीच्या वेळी भारती सिंगने नेहमीच त्याला पाठिंबा दिला आहे. अलीकडे, जेव्हा कपिल आजारी पडला होता आणि त्याचा परिणाम त्यांच्या शोवर होत होता. त्यावेळी भारतीने त्याची मदत केली होती. कपिल आणि भारती दोघेही पंजाबचे आहेत. कपिल भारतीला त्याची छोटी बहीण मानतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अडचणीच्या वेळी हा शो भारतींकडून काढून घेतला जाऊ नये, अशी त्याची इच्छा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.