Take a fresh look at your lifestyle.

सोनू सूद पुन्हा एकदा मदतीला; झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये बिझनेस सुरू करण्यासाठी देणार खास ऑफर

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता सोनू सूद लॉक डाउन दरम्यान देशातील अनेक गरीब लोकांच्या मदतीला धावून आला होता. सोनू सूदने लॉक डाउन दरम्यान अनेक लोकांच्या घराचं आणि त्यांच्या जेवणाची सोय करून दिली होती. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था असो वा नोकरीची संधी असो ..सोनू सूद प्रत्येक वेळी गरिबांचा मासिहा म्हणून धावून आला. आताही त्याने असंच अनोखं काम केलं आहे. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांनाही आता सोनू सूद मदत करणार आहे.

खरंतर, सोनू सूदने बेरोजगार तरुणांसाठी एक नवीन योजना आणली आहे. ज्यामध्ये त्यांच्याकडे पैसे नसतील असेही लोक आता त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करतील. कारण आर्थिक पाठबळ नसणाऱ्यांना आता सोनू सूद मदत करणार आहे. त्याने स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली.

ट्विटरवर त्याने एक फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘सज्ज व्हा.’ ‘आता झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये स्वतःच बॉस व्हा. तुमच्या गावात स्वतःचा व्यवसाय करा. या नवीन उपक्रमांतर्गत आम्ही गावातील तरुणांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करू.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.