Take a fresh look at your lifestyle.

मराठमोळी सौम्या कांबळे ठरली ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन- 2’ची विनर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| सोनी टेलिव्हिजन या वाहिनीवरील डान्स रिआलिटी शो इंडियाज बेस्ट डान्सर सीझन – २ क्या विजेत्याचे अखेर नाव सर्वांनाच समजले आहे. महाराष्ट्राची मराठमोळी डान्सर सौम्या कांबळेने हा किताब जिंकला आहे. यात तिला १५ लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. शिवाय एक आलिशान कार देखील बक्षीस स्वरुपात देण्यात आली आहे. तर सीझनमध्ये सौम्याची प्रशिक्षिका असणारी नृत्य प्रशिक्षक वर्तिका झा हीला देखील सन्मानित करण्यात आलं आहे. 

 

 

मुख्य आणि कौतुकाची बाब अशी की नृत्य प्रशीक्षिका वर्तिका झा सलग दुसऱ्यांना सीझनमध्ये विजयी नृत्य प्रशिक्षक ठरली आहे. पहिल्या सीझनमध्ये तिने टायगर पॉपला प्रशिक्षण दिलं होत. या सीझनमध्ये अंतिम ५ जणांमध्ये जयपूरचा गौरव सरवन उपविजेता आणि ओदिशाची रोजा राणा दुसरी उपविजेता ठरली. तर आसामचा रक्तिम ठाकुरिया याला तीसरा आणि जमरूध चौथा आला आहे. या सर्व स्पर्धकांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.

 

या निकालानंतर सौम्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सौम्या कांबळे हिचा डान्स पाहून तिला छोटी हेलन हि उपमा दिली होती. सौम्याची स्वत:ची अशी वेगळी डान्स स्टाईल आहे. बेली डान्स आणि फ्री-स्टाईल डान्स सगळ्यात ती इतरांपेक्षा वेगळी आणि उत्तम ठरली. सौम्याच्या वडिलांना तिनं डॉक्टर व्हावं अशी इच्छा होती. मात्र आईने आपल्या मुलीनं डान्सरच व्हावं असं स्वप्न पाहिलं आणि आज ते स्वप्न साकार झालं.