Take a fresh look at your lifestyle.

चाहत्याची मिठी पवन कल्याणच्या अंगाशी; कारखाली जाता जाता बचावला अभिनेता

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आणि जनसेना पक्षप्रमुख अभिनेता पवन कल्याण याच्या चाहत्यांची संख्या अफाट आहे. त्यामुळे अनेकदा अनेक ठिकाणी पवन कल्याणची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होताना दिसते. पवन कल्याणदेखील चाहत्यांना कधीच निराश करत नाही. मात्र यावेळी चाहत्यांच प्रेम त्याच्या अंगाशी येता येता राहील म्हणायची वेळ आली. सध्या सोशल मीडियावर पवन कल्याणचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पवन कल्याण गाडीखाली येता येता बचावला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

अभिनेता पवन कल्याणची भापजासोबत युती करून २०२४’च्या निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. सध्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. ज्यात पवन कल्याण एका रॅलीदरम्यान कारवर चढून लोकांना हात दाखवत असताना अचानक तो कारवर पडला आणि कारखाली पडता पडता वाचला. हा व्हिडीओ स्वतः पवन कल्याणने जनसेना मिशन २०२४ या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

त्याच झालं असं कि, व्हायरल व्हिडीओनुसार अभिनेता पवन कल्याण रॅलीदरम्यान कारवर चढतो. यानंतर तो आपल्या चाहत्यांना हात दाखवतो. यावेळी अचानक एक व्यक्ती त्याच्याजवळ येते आणि त्याच्या गळ्यात हात टाकून काहीतरी बोलू लागते. तेव्हाच अभिनेता खाली पडतो. सुदैवाने तो कारखाली पडण्यापासून बचावतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाल्यांनतर अनेकांनी यावर कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये लोकांनी पवन काळ्यांविषयी काळजी व्यक्त केली आहे. तर अनेक चाहते जी व्यक्ती पवन कल्याणजवळ आली होती ती कोण आहे? याची माहिती विचारताना दिसत आहेत. दैव बलवत्तर म्हणून पवन कल्याण वाचला. नाहीतर मोठी दुर्घटना झाली असती. असेही अनेकांनी म्हटले आहे.