Take a fresh look at your lifestyle.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा; प्रसिद्ध निर्माते प्रदीप राज यांचे कोरोनामुळे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. कन्नड चित्रपट निर्माते प्रदीप राज यांचे निधन झाल्याची बातमी आहे. त्यांचे निधन कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झाले असून कन्नड सिनेसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. गुरुवारी पहाटे साधारण तीन वाजण्याच्या सुमारास चित्रपट निर्माते प्रदीप राज यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप राज यांच्यावर आज पुद्दुचेरीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपट निर्माते प्रदीप राज यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र या उपचारांचा काहीच फायदा झाला नाही. चालू उपचारादरम्यानच प्रदीप राज यांनी अखेरचा श्वास घेत संपूर्ण जगाचा निरोप घेतला. प्रदीप राज यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चित्रपट निर्माते प्रदीप राज यांनी त्यांच्या दिग्दर्शन कलेच्या कारकिर्दीमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीला अतिशय लोकप्रिय आणि हिट पे हिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी निर्मिती केलेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले आहेत.

‘गिरगटले’, ‘किराताका’, ‘होटी उरिवा किच्चिनल्ली’ यासारखे सुपरहिट चित्रपट प्रदीप राज यांनी सिनेसृष्टीला दिले आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीच्या वाढीसाठी, चांगल्या चित्रपटांची निर्मिती गरजेचे असते आणि या निर्मितीत त्यांचं मोलाचं योगदान राहिल आहे. दाक्षिणात्य अभिनेता यशसोबत त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. ‘किराताका’ या तमिळ चित्रपटाचा त्यांनी रिमेक केला होता. ‘किराताका’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नावावर अनेक नावाजलेले पुरस्कार केले आहेत.