Take a fresh look at your lifestyle.

‘जय भीम’ चित्रपटाचा मुख्य नायक सुरिया’च्या जीवाला धोका; तणावपूर्ण वातावरणामुळे घराबाहेर वाढवली सुरक्षा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सद्या ‘जय भीम’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अनेकांनी या चित्रपटाला दाद दिली तर अनेकांनी टीकांचा वर्षाव केला. यानंतर चेन्नई शहर पोलिसांनी आज गुरुवारी चित्रपट अभिनेता ‘सुरिया शिवकुमार’ याच्या निवासस्थानी चोवीस तास सुरक्षा पुरवण्यासाठी सशस्त्र पोलीस तैनात केले आहेत. याचे कारण असे कि दाक्षिणात्य अभिनेता सुरिया सिवाकुमार याला ‘जय भीम’ चित्रपट केल्यानंतर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. म्हणूनच त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शिवाय सुरियाला धमकावणाऱ्या व्यक्तीविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि वैयक्तिक सुरक्षा अधिकारी देखील तैनात केले आहेत.

या सर्व वादाचे आणि प्रकरणाचे कारण म्हणजाई या चित्रपटात प्रकाश राज एका व्यक्तीसोबत बोलत असतात मात्र समोरचा व्यक्ती त्यांच्याशी तमिळ ऐवजी हिंदी भाषेत बोलतो. ते ऐकून प्रकाश त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावतात आणि त्या व्यक्तीला हिंदी ऐवजी तमिळ भाषेत बोलायला सांगतात. याच दृश्यावरून हिंदी भाषिक नाराज झाले आहेत. शिवाय वन्नियार संगमच्या प्रदेशाध्यक्षांनी अभिनेता सुरिया, ज्योतिका, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि जय भीमचे दिग्दर्शक टीजे ग्नानवेल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

यात, चित्रपटाच्या निर्मात्यांनी जनतेची माफी मागावी आणि मानहानिकारक म्हणण्यात आलेले सर्व दृश्य काढून टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या नोटिसमध्ये एका अशा दृष्याचे वर्णन केले आहे. ज्यात अग्निकुंड एका कॅलेंडरवर दिसत आहे. खरतर, अग्निकुंड हे वन्नियार समाजाचे प्रतिक आहे. एवढेच नाही, तर राजकन्नूचा छळ करणाºया पोलिसाचे चरित्र हेतुपुरस्सर वन्नियार जातीशी संबंधित जाखविण्यात आले आहे, असा दावाही या नोटिसीत करण्यात आला आहे. याच वादावरून सुरियाला धमक्या येत असल्याचा अंदाज लावला जात आहे.

दरम्यान समीक्षक आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून सुरियाने ट्विटरवर आभार मानले होते. या ट्विटमध्ये अभिनेत्याने लिहिले कि, ‘जय भीम’बद्दलचं हे प्रेम जबरदस्त आहे. मी याआधी कधीच असं पाहिलं नाही. तुम्ही सर्वांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि प्रेम याबद्दल मी आपला किती आभारी आहे, हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. आमच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!