Take a fresh look at your lifestyle.

हाऊसफुल्ल! साऊथ टच ‘वन फोर थ्री’चा सिनेमागृहात ए वन दणका

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर टॅगलाईनने तरुणाईला वेढल्यानंतर आता या चित्रपटाने चित्रपट गृह देखील गाजवले आहेत. लक्षवेधक टॅगलाईन आणि हटके हॅशटॅग प्रेमाची परिभाषा बदलणाऱ्या ‘143’ या चित्रपटाचा नुसता कल्ला चालू आहे. ‘शारदा फिल्म्स प्रोडक्शन’ निर्मित आणि विरकुमार शहा निर्मित ‘143′ हा रोमँटिक आणि खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित चित्रपट ४ मार्च २०२२ पासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतोय. पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट सिनेमागृहात हाऊसफुल्ल झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी विशेष म्हणजे तरुणांसह अगदी इतर वयोगटातील प्रेक्षकांचीदेखील गर्दी पाहायला मिळतेय.

या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण दाक्षिणात्य पद्धतीने केले असले तरी हा एक मराठी चित्रपट आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाकडे विशेष ओढ दिसत आहे. मराठवाडा, औरंगाबाद, नांदेड, परभणी, नागपूर, नाशिक या भागात तर या चित्रपटाचा एकही शो रिकामा गेला नाही. उलट सलग हा चित्रपट हाऊसफुल्ल झाला आहे. तर पुण्यातील काही भागात चित्रपटाने हाऊसफुल्ल होत मोठा गल्ला जमवला आहे. प्रेक्षकवर्ग या चित्रपटाचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. तसेच या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची लव्ह केमिस्ट्री दिसतेय. तर अभिनेता वृषभ शहा जबरदस्त खलनायक म्हणून समोर आला आहे. या चित्रपटात सुरेश विश्वकर्मा आणि शशांक शेंडे यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत.

‘वन फोर थ्री’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी चित्रपटासाठी संगीतबध्दता केली आहे. शिवाय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नामांकित नृत्य दिग्दर्शक आर. कलाई केरला यांनी या चित्रपटाची नृत्य दिग्दर्शकाची सूत्रे जबाबदारीने पार पाडली आहेत. तसेच छायाचित्रकार विकास सिंग यांनी चित्रपटासाठी उत्तम चित्रीकरण केले आहे. तर लखन चौधरी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि गायिका आर्या आंबेकर हिने ‘भरली मना मध्ये’ हे गाणे गेले आहे. तसेच ‘वाचू दे इष्काचा प्राण’ ही कव्वाली प्रमोद त्रिपाठी यांनी गायली असून आयटम सॉंग ‘पडला खटका’ रेश्मा सोनावणे यांनी शब्दबद्ध केले आहेत. याशिवाय प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी ‘धिंगाणा’ पार्टी सॉंग गायले आहे.