Take a fresh look at your lifestyle.

कडेकोट बंदोबस्तात पार पडणार वरुण-नताशाचा लग्नसोहळा ; मोबाईल फोन नेण्यासही बंदी

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | गेल्या कित्येक महिन्यांपासून अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल या जोडीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यासाठी वरुण,नताशा आणि कुटुंबिय अलिबागला पोहोचले आहेत. अखेर ही जोडी विवाहबंधनात बांधली जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. येत्या २४ जानेवारीला ही जोडी लग्नगाठ बांधणार आहे. त्यासाठी वरुण,नताशा आणि कुटुंबिय अलिबागला पोहोचले आहेत. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा रंगणार आहे. मात्र, या समारंभात सहभागी होणाऱ्यांसाठी एक खास अट असल्याचं सांगण्यात येत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार मॅन्शन हाऊसभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येनं सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत, तर प्रत्येक कोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. जेणेकरून लग्नात कोणताही हस्तक्षेप होणार नाही.

वरुण आणि नताशा यांचं लग्न अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. अलिबागमधील ‘द मॅन्शन हाऊस’ येथे हा लग्नसोहळा संपन्न होणार असून सुरक्षेची अत्यंत कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. डेव्हिड धवन हे लग्न खूप खासगी ठेवू इच्छित आहे. अशा परिस्थितीत त्यांनी लग्नात काम करणा कर्मचार्‍यांकडून त्यांचा सेल फोन वापरण्यास नकार दिला आहे, जेणेकरुन कोणीही फोनवरुन लग्नात व्हिडिओ बनवू नये.

वरुण आणि नताशा यांचं लग्न अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. अलिबागमधील ‘द मॅन्शन हाऊस’ येथे हा लग्नसोहळा संपन्न होणार असून सुरक्षेची अत्यंत कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे.

वरुण आणि नताशाच्या लग्नाच्या कार्यक्रमांची सुरुवात संगीत सोहळ्याने होईल. वरुणचे बॉलिवूडमधील मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर-मलाइका अरोरा, जाह्नवी कपूर-खुशी कपूर, कतरिना कैफ, नीतू कपूर, कियारा अडवाणी, अनिल कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.