Take a fresh look at your lifestyle.

अनुपम खेर यांच्या आईकडून मोदींसाठी खास भेट; पहा भेटीचे फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे अलीकडेच विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स या चित्रपटटमुळे चांगलेच चर्चेत होते यात त्यांनी काश्मिरी पंडितांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेला प्रेक्षकांनी, समीक्षकांनी आणि अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नावाजले होते. अनुपम खेर यांचे पीएम मोदी यांच्याशी चांगले संबंध असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. दरम्यान अनुपम खेर यांच्या आईनी मोदींसाठी खास भेटवस्तू पाठवली आहे. हि भेटवस्तू पाहून मोदींना अतिशय आनंद झाल्याचे दिसून येत आहे. या भेटीचे फोटो अनुपम खेर यांनी शेअर केले आहेत.

आपल्या आईने पाठवलेली भेट हि मोदींना देण्यासाठी अनुपम यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. दरम्यानचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनुपम यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी अनुपम खेर यांनी त्यांच्या आई दुलारी खेर यांच्या वतीने मोदींना रुद्राक्षांची माळ अशी खास भेट दिली. हि भेटवस्तू पाहून मोदींना अतिशय आनंद झाला आहे. हे अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या फोटोंमधून दिसत आहे. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी आणि अभिनेते अनुपम खेर कॅमेरासमोर उभे असताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये अनुपम हे पंतप्रधानांना रुद्राक्षांची माळ भेट देताना दिसत आहेत.

या फोटोसह कॅप्शन पोस्ट करताना अनुपम खेर यांनी लिहिले आहे कि, ‘आदरणीय पंतप्रधानजी आज तुम्हाला भेटून मन आणि आत्मा दोन्ही सुखावले. देशासाठी आणि देशवासीयांसाठी तुम्ही अहोरात्र करत असलेल्या परिश्रमाबद्दल धन्यवाद म्हणायची संधी मिळाली. ज्या श्रद्धेने तुम्ही माझ्या आईने दिलेली रुद्राक्षांची माळ स्वीकारली, ते मला आणि दुलारीजींना नेहमीच लक्षात राहील. परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो.’ तर, पंतप्रधान मोदींनी देखील ट्विट करीत अनुपम यांचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले कि, “खूप खूप धन्यवाद अनुपम खेर. आदरणीय माताजींचा आणि देशवासियांचा आशीर्वादच मला भारती माँच्या सेवेसाठी सतत प्रेरित करत आहे.’ अशी भावना त्यांनी यातून व्यक्त केली.