Take a fresh look at your lifestyle.

‘ती’ची गोष्ट सांगणाऱ्या ‘Y’ चित्रपटाचं हरियाणात स्पेशल स्क्रीनिंग; प्राजक्ता माळीने शेअर केले फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘Y’हा एक वेगळे आणि थरारक कथानक असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या टायटल पासून याची जोरदार चर्चा आहे. शिवाय याचे पहिले पोस्टर आणि त्यानंतर रिलीज. सगळं कसं वेगवान होत. या चित्रपटाचे ‘वाय’ शीर्षक ऐकल्यानंतर वाय…? व्हाय.? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. पण आता जेव्हा हा चित्रपट अजूनही थिएटर आणि महाराष्ट्र सोडून इतर राज्यांत चालतो आहे तेव्हा समजत कि व्हाय..? वाय. या चित्रपटात अनेक स्त्री भूमिका आहेत. त्यांपैकी एक विशेष भूमिका मुक्ता बर्वेसह प्राजक्ता माळीनेही साकारली आहे. या गोष्टीचा याआधीही तिने आनंद व्यक्त केला आहे. पण आज हरियाणातील स्पेशल स्क्रीनिंगनंतर तिने फोटो आणि कॅप्शन शेअर केलं आहे.

प्राजक्ता माळीने या प्रसंगाचे विविध फोटो शेअर करत हि पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये या चित्रपटाचा आपण एक भाग आहोत याचा आनंद प्राजक्ताने व्यक्त केला आहे. शिवाय हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्याबद्दल तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्राजक्ताने लिहिलं आहे कि, ‘.. आणि दिल्ली नंतर चंदीगड- हरयाणा येथे आमचा प्रिय चित्रपट “Y” चे स्पेशल स्क्रीनिंग होते. (टीमने हरियाणाच्या माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.). हा चित्रपट महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय याचा आनंद आहे. हो हा पॅन इंडिया लेव्हलचा विषय आहे.

सामान्यांच्या कल्पनेपलीकडील ‘ती’च्या लढ्याची गोष्ट घेऊन हा चित्रपट २४ जून २०२२ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन अशा दोन्हीही प्रमुख जबाबदाऱ्या अजित सूर्यकांत वाडीकर यांनी पार पाडल्या आहेत. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून हा मराठीतील पहिलाच असा हायपरलिंक थरार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वेशिवाय प्राजक्ता माळी, रसिका चव्हाण अशा अभिनेत्री अन्य प्रमुख भूमिकेत आहेत. तर नंदू माधव, संदीप पाठक, ओमकार गोवर्धन, सुहास शिरसाट, प्रदीप भोसले, रोहित कोकाटे, संदीप दंडवते हे पुरुष कलाकारही अन्य मुख्य भूमिकेत आहेत.