Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

स्पृहा जोशीचं YouTube चॅनल झालं होतं हॅक; काव्यवाचन, ट्रॅव्हल ब्लॉग सगळे व्हिडीओ झालेले DELETE

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 19, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Spruha Joshi
0
SHARES
43
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री स्पृहा जोशी ही मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. शिवाय ती एक उत्तम निवेदिका आणि सृजनशील कवयित्रीदेखील आहे. स्पृहाचं स्वतःचं एक युट्यूब चॅनेलसुद्धा आहे जे तिने २०११ साली सुरु केलं आहे. या चॅनलच्या माध्यमातून स्पृहा अनेकदा व्यक्त होत असते. पण काही दिवसांपूर्वी तीच हे यु ट्यूब चॅनल हॅक झालं होतं. ज्यामुळे स्पृहाची एक दोन नव्हे तर तब्बल १२ वर्षांची मेहनत वाया जाते का काय..? अशी भीती तिला वाटू लागली होती. पण तिच्या चॅनलची रिकव्हरी झाल्यानंतर तिचा आणि चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. बारा वर्षांच्या मेहनतीचं फळ म्हणून..

View this post on Instagram

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

अभिनेत्री स्पृहा जोशीच्या युट्यूब चॅनलचं नाव ‘स्पृहा जोशी’ असे असून हे चॅनल तिने २०११ साली सुरु केले आहे. या चॅनलला आज जवळजवळ १२ वर्ष झाली आहेत. याच्या माध्यमातून स्पृहा स्वतःच्या कविता, मुलाखती अशा विविध गोष्टी चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. गेल्यावर्षीच तिच्या या चॅनलने १ लाख सबस्क्राईबर्स पूर्ण केले आहेत. मात्र काही दिवसांपासून तिने एकही व्हिडीओ या चॅनलवर शेअर केला नव्हता. त्यामुळे अनेक चाहत्यांनी तिला मेसेज करत विचारणा केली. चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर स्पृहाने सोशल मिडीया इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट करून दिले कि, ‘माझं यु ट्यूब चॅनल हॅक झालं होतं’.

View this post on Instagram

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

पण स्पृहाच्या टीमने मोठ्या मेहनतीने तिचं चॅनल पुन्हा मिळवलं आणि आर्थिक फटका टळला. स्पृहाने यासाठी तिच्या फॅन्सचे आणि तिच्या टीमचे आभार मानले. स्पृहाची १२ वर्षांची मेहनत वाया गेली नाही याचा आनंद तिच्या चाहत्यांनी व्यक्त केला आहे. अभिनेत्री स्पृहा जोशींच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, ती सध्या झी मराठीवरील ‘लोकमान्य’ या मालिकेत लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामा यांची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता क्षितिश दाते लोकमान्य टिळकांची भूमिका साकारतोय. या मालिकेच्या निमित्ताने स्पृहाने ८ वर्षांनी मालिका विश्वात कमबॅक केले आहे.

Tags: Instagram PostMarathi ActressSocial Media Account HackedSpruha Joshiyoutube channel
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group