लतादीदींच्या पार्थिवाचे दर्शन करताना शाहरुख खान थुंकला?; जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवारी लता दीदींचे निधन झाल्यानंतर संपूर्ण जगभरात शोककळा पसरली आहे. दरम्यान दीदींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक दिग्गज कलाकार आणि दिग्गज नेते मंडळी उपस्थित होते. लता दीदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्य संस्कार करण्यात आले. दरम्यान त्यांच्या चाहत्यांचा महासागर लोटला होता. यावेळी उपस्थित कलाकार मंडळींमध्ये शाहरुख खान देखील उपस्थित होता. जेव्हा शाहरुख लता दीदींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेला तेव्हा तो थुंकला असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. अनेक नेटकरी यावरून शाहरुखला ट्रोल करत आहेत.
View this post on Instagram
त्याचे झाले असे कि, लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान उपस्थित होते. तेंडुलकरनंतर शाहरूख खान लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुढे आला. त्यावेळी शाहरूख खान याने लतादीदींना श्रद्धांजली वाहत असताना दुआ मागितला. यासाठी शाहरुख खाननं मास्क खाली करुन केलेली कृती ही थुंकण्याचा प्रकार नसून फुंकण्याची स्थिती होती. त्यामुळे ट्रोलर्सने ट्रोलिंग करताना संपूर्ण व्हिडीओ व्यवस्थित पाहिला तर त्यांना नक्कीच समजून येईल.
शाहरुख खान हा धर्माने मुस्लिम आहे. यामुळे शाहरुख खानने मास्क खाली करुन लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी दुवा मागितली. दुवा मागतेवेळी फुंकर घालतानाचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काहींच्या मते शाहरुख खानने असं करुन लता मंगेशकर यांचा अपमान केला आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलंय. पण शाहरुख खानने असे केलेले नाही हे उघड आहे. कारण थुंकणे आणि फुंकडे या दोन्ही स्थितीत ओठांची रचना सारखीच असते. यामुळे अनेकांचा गैरसमज असण्याची शक्यता आहे. तर काही लोक ट्रोल करण्याच्या हेतूने मुद्दामून हा विषय वेगळ्या वळणाकडे नेताना दिसत आहेत.