Take a fresh look at your lifestyle.

SRK’च्या ‘मन्नत’ची सोशल मीडियावर चर्चा; एव्हढ्या ट्रेंडींगचं कारण तरी काय..? जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये किंग खान म्हणून ओळखलं जात. डीडीएलजे पासून त्याची लव्हर बॉयवाली अदा आजही तरुणाईच्या मनावर राज्य करतेय. यामुळे शाहरुख त्याच्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतो. कभी बेनाम.. कभी शोहरत अशा परिस्थितीत शाहरुखचे फॅन्स नेहमीच त्याच्या पाठीशी दिसले आहेत. आता एव्हढं प्रेम असेल तर त्याच्या आयुष्यात आता काय चालू आहे याबाबत उत्सुकता असणे किती साहजिक आहे नाही का..? त्यामुळे सोशल मीडियावर SRK च नाव आल कि चर्चा सुरु होते. यावेळी शाहरुखपेक्षा त्याच्या निवासस्थानाची म्हणजेच मन्नत’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मन्नतने ट्रेंडिंग पोल दणाणुन सोडला आहे. चला तर कारण जाणून घेऊया.

त्याच झालं असं कि, शनिवारी म्हणजेच २३ एप्रिल २०२२ रोजी अभिनेता शाहरुख खान याने मुंबई स्थित निवासस्थान ‘मन्नत’ या बंगल्यावर नवीकोरी चकाकणारी नेमप्लेट लागली आहे. ती पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर भरपूर पोस्ट केल्याचे पाहायला मिळाले. हळूहळू हॅशटॅग मन्नत इतके वाढले कि सोशल मीडियाचा ट्रेंडिंग पोल दणाणू लागला.

शाहरुखच्या चाहत्यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर करत एक वेगळाच आनंद व्यक्त केला आहे. अनेक चाहत्यांनी मन्नतचे विवविध अँगलने काढलेले फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. तर काहींनी मन्नतच्या नेमप्लेटच्या वेगवेगळ्या फोटोंचा कोलाज शेअर केला आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनी मन्नतच्या रिन्युएशनचे फोटो बिफोर आणि आफ्टरटॅगसह शेअर केले आहेत.

असं म्हटलं जातं कि फक्त आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात शाहरुख खानचा एक भलामोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे शाहरुख म्हणा किंवा SRK बस्स्स….नाम हि काफी है। अनेकदा शाहरूखचे चाहते त्याच्याबद्दल नवीन काही समजते का याची वाटच पाहत असतात. अगदी त्याच्या खाजगी आयुष्यापासून ते त्याच्या रील लाइफपर्यंत सगळं आपल्याला माहित असावं असा चाहत्यांचा अट्टाहास असतो.

शिवाय शाहरुखच्या चित्रपटाचीदेखील फार आतुरतेने प्रतीक्षा केली जाते. दरम्यान अभिनेत्याने नुकतंच चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबत आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘डंकी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. त्यामुळे सध्या तो आगामी चित्रपटामुळेदेखील प्रचंड चर्चेत आहे.