Take a fresh look at your lifestyle.

टिप्पणीआधी काळजीपूर्वक अभ्यास करा; NCB’ला ट्रोल करणाऱ्यांसाठी क्रांती रेडकरचा सल्ला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। NCB’ ने शनिवारी रात्री कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्स पार्टीत छापा मारला आणि भल्याभल्यांच्या चेहऱ्याचे रंग उडाले. हि छापेमारी NCB’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पार्टीमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खान असल्यामुळे त्याला NCBच्या कोठडीची हवा खावी लागली. यामुळे हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. दरम्यान NCB फक्त बॉलिवूड सेलिब्रिटींना लक्ष्य करत असल्याची टीका अनेकांनी केली आहे. या टीकांवर आता अभिनेत्री आणि समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिने प्रतिक्रिया देत ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

क्रांतीने सोशल मीडियावर पोस्ट करीत NCBचे कौतुक करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत तर टीका करणाऱ्यांना अभ्यास करा आणि मग बोला असा सल्ला दिला आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले कि, “तुम्ही करत असलेल्या पाठिंब्यासाठी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार. खरं तर आभार मानण्यासाठी शब्द पुरेस नाहीत. खासकरुन एनसीबीचे प्रयत्न, सतत छापेमारी आणि निर्भीडपणे ते करत असलेली मेहनत तुम्ही ओळखल्याबद्दल धन्यवाद. दुर्दैवाने ज्यावेळी बॉलिवूडचा संबंध येतो त्यावेळी लोक बातम्यांमध्ये रस घेतात. NCB करत असलेल्या कामाचं वेळोवेळी माध्यमांकडून रिपोर्टिंग होत आहे.

पुढे, “दोषींना पकडण्याचं त्यांचं काम सुद्धा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि, अशाचप्रकारे तुमचं प्रेम, पाठिंबा कायम पाठीशी राहिल हीच आशा व्यक्त करते. सध्या NCB मुद्दाम बॉलिवूडला लक्ष्य करतेय, असे आरोप समाजातील काही जण करत आहेत. पण, त्या सगळ्यांना एक विनंती आहे. प्लीज आधी आकडेवारीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्यानंतर टिप्पणी करा. ते दररोज नव्या संघर्षांना सामोरे जात असतात आणि, आपण घरी सुरक्षित बसून आपल्या फॅन्सी फोनमधून टीका टाइप करत असतो. नि:स्वार्थपणे देशाची सेवा करणाऱ्यांसोबत चांगल्या पद्धतीने वागुयात.”